11th Admission Process: राज्यभरातील अकरावीच्या प्रवेशासाठी २१ मेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २८ मे ही शेवटची तारीख आहे. यानंतर ३० मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी आणि ३ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यावर्षीपासून संपूर्ण प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने (Maharashtra FYJC Admission 2025) पार पडणार आहे.
अर्ज भरण्यात अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी 8530955564 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा.
पूर्वी काही खासगी कनिष्ठ कॉलेजमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देत शुल्क आकारले जात होते. परंतु यावर्षीपासून ही पद्धत थांबवण्यात आली असून सर्व प्रवेश ऑनलाइन आणि क्षमतेनुसारच होतील, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच दिवशी मोठी अडचण आली आहे. ऑफिशियल संकेतस्थळावर क्लिक केले असता साईट अंडर मेंटेनन्स असा मेसेज येत आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना बसतोय फटका बसत आहे. सोमवार पासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आज बुधवार सकाळ पासून अनेक विद्यार्थ्यांना ही समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी आहेत. शिक्षण विभागाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.