ठाण्यात होतंय मोठं Business Hub, तब्बल 176 गावांचा होणार कायापालट; समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी

Business Hub In Thane: समृद्धी महामार्गालगत असलेल्या 130 गावांचा आता झपाट्याने विकास होणार

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 9, 2025, 07:41 AM IST
ठाण्यात होतंय मोठं Business Hub, तब्बल 176 गावांचा होणार कायापालट; समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी
130 villages included in Aamne Growth Center near samruddhi mahamarg starting point

Business Hub In Thane: मुंबईनंतर आता शहराच्या वेशीवर असलेल्या ठाणे शहराचाही झपाट्याने विकास होतोय. अलीकडेच ठाणे शहरात मेट्रो धावली लवकरच मेट्रोच्या फेऱ्यादेखील सुरू होती. इतकंच नव्हे तर समृद्धी महामार्गाची सुरुवातदेखील ठाण्यातील आमने येथे होत आहे. याच आमने येथे ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार आहे. या ग्रोथ सेंटरमध्ये नव्याने 130 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. अलीकडेच राज्य सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source

आमने ग्रोथ सेंटरमध्ये एकूण 176 गावांचा समावेश आहे. 483 चौरस किमी क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे. 

राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि भिवंडी तालुक्यातील 46 गावांसाठी सप्टेंबर 2024मध्ये एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी 109 चौरस किमी क्षेत्रासाठी एमएसआरडीसीची नियु्ती करण्यात आली होती. आता यात अनगाव सापे विकास केंद्रातील 130 गावांच्या 374 चौ किमी क्षेत्राचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. 

भिवंडी 148 व कल्याणमधील 28 गावांसाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट, बीकेसी, सीप्झसारखेच हे महत्त्वाकांक्षी ग्रोथ सेंटर असणार आहे. भिवंडीतील 148 व कल्याणमधील 28 गावांसाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण म्हणून काम करेल. 

आमने भागातील 176 गावांमध्ये उभारण्यात येणाऱ्या ग्रोथ सेंटरमध्ये इंडस्ट्रिअल पार्क, लॉजिस्टिक हब, टेक्सटाइल पार्क, फार्मा अँड बायटेक पार्क, फुड प्रोसेसिंग पार्क, इनोव्हेशन पार्क, मेडिसिटी, स्पोर्ट्स अँड रिक्रीएशन हब, हेल्थकेअर क्लस्टर, अॅग्रीकल्चर हब, होलसेल ट्रेड सेंटर यांचा समावेश असेल. इतकंच नव्हे तर रहिवासी आणि व्यावसायिक इमारती,  थिम बेस पार्क यांचाही समावेश असेल. त्याचबरोबर या भागाचा ट्रान्सिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट पद्धतीने विकास साधला जाणार आहे.

FAQ

१. आमने ग्रोथ सेंटर म्हणजे काय?

आमने ग्रोथ सेंटर हे ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या आमने येथे उभारले जाणारे महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प आहे. हे मुंबईतील नरिमन पॉइंट, बीकेसी किंवा सीप्झसारखे ग्रोथ सेंटर असणार आहे. येथे इंडस्ट्रिअल, व्यावसायिक, रहिवासी आणि मनोरंजन सुविधांचा समावेश असेल. समृद्धी महामार्गाची सुरुवातही याच ठिकाणी होत आहे.

२. या ग्रोथ सेंटरमध्ये किती गावांचा समावेश आहे?

एकूण १७६ गावांचा समावेश आहे. यापैकी भिवंडी तालुक्यातील १४८ गावे आणि कल्याण तालुक्यातील २८ गावे आहेत. अलीकडेच अनगाव-सापे विकास केंद्रातील १३० नवीन गावांचा समावेश करण्यात आला आहे.

३. ग्रोथ सेंटरचे क्षेत्रफळ किती आहे?

एकूण ४८३ चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. सुरुवातीला सप्टेंबर २०२४ मध्ये कल्याण आणि भिवंडी तालुक्यातील ४६ गावांसाठी १०९ चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी नियोजन करण्यात आले होते. आता अनगाव-सापे विकास केंद्रातील १३० गावांसाठी ३७४ चौरस किलोमीटर क्षेत्राचा नवीन समावेश करण्यात आला आहे.

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More