धक्कादायक घटना, मॅजिक बॉल गिळल्याने चिमुकल्याचा मृत्यू
Magicball : पालकांसाठी चिंता करायला लावणारी बातमी. आपल्या मुलांना खेळण्यासाठी जी खेळणी देत असाल तर सावधान राहा. कारण...
Nashik Magicball : पालकांसाठी चिंता करायला लावणारी बातमी. आपल्या मुलांना खेळण्यासाठी जी खेळणी देत असाल तर सावधान राहा. कारण हीच खेळणी लहान मुलांच्या जीवावर बेतत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नाशिक येथे घडली. चिमुकल्याला खेळण्यासाठी मॅजिक बॉल दिला. मात्र, त्याने तो गिळल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पत्नीच्या तक्रारीनंतर वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. (18 month old boy dies after swallowing magic ball in Nashik)
नाशिक शहरात अठरा महिन्यांच्या मुलाला छोटा मॅजिक बॉल खेळण्यास दिल्याने त्याचा मृत्यू झाला. मॅजिक बॉल मुलाला खेळण्यास देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या प्रकरणात मुलाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.( child's death case registered against father in Nashik ) त्याचे वडील संकेत बोराडे हे वैद्यकीय क्षेत्रात कामाला असल्याने त्यांना या मॅजिक बॉलने मुलाचा मृत्यू होऊ शकतो हे माहिती होते, असे असूनही त्यांनी पती-पत्नीच्या वादातून हा प्रकार जाणून करण्यात आला असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
नाशिक शहरातील मोटवानी रोड भागात शांती कृपा सोसायटीत हा प्रकार घडला आहे. घटना सहा महिन्यापूर्वीची असली तरी आता पत्नीच्या तक्रारीवरुन हा प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूस वडील कारणीभूत असल्याचा आरोप पत्नीने केला आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संकते बोराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी मॅजिक बॉल खेळायला दिला म्हणून मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.