Maharashtra News: राज्यातील शालेय पोषण आहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांनी केलाय. हिवाळी अधिवेशनादरम्यान पाटलांनी पोषण आहारातील घोटाळ्याचा बॉम्ब टाकलाय. मुलांना दिला जाणाऱ्या पोषण आहारातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. शालेय पोषण आहारात सुमारे 1800 कोटी रुपयांच्या या योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप आहे.
टेंडरमध्ये हिरवा वाटाणा नमूद असताना प्रत्यक्षात पांढरा वाटाणा पुरवण्यात आल्याचा आरोप कैलास पाटलांनी केलाय. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही कैलास पाटलांनी केलीय.तर यावर काँग्रेसनंही आक्रमक भूमिका घेतलीय. शालेय पोषण आहारात प्रचंड घोटाळा असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय. तर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी सतेज पाटलांनी केलीय.
दरम्यान, भाजपनं मात्र पुराव्यांची मागणी केलीय.भाजप नेते प्रसाद लाड यांनी पुरावे देण्याची मागणी केलीय. शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटलांनी याप्रकरणाला वाचा फोडली. त्याचे आता पडसाद उमटलेत.चिमुकल्या मुलांच्या पोषण आहारातही असा भ्रष्टाचार होत असेल तर यावर तातडीनं कारवाई होणं अपेक्षित आहे.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.