डोंबिवली : मुंबईतील फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा वार्षिक हफ्ता मिळतो, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने आंदोलन सुरू केलं असलं, तरी अद्यापही काही ठिकाणी फेरीवाले हटलेले नाहीत, यावर ज्या हद्दीत हे फेरीवाले आहेत, त्यातील स्थानिक पोलीस स्टेशनला आणि प्रशासनाला हफ्ते दिले जात असल्याने हे फेरीवाले हटत नसल्याचं सांगण्यात येत आहे.


राज ठाकरे यांनी याविषयी आज बोलताना सांगितलं की, फेरीवाल्यांकडून प्रशासनाला दरवर्षी 2 हजार कोटींचा हफ्ता मिळतो. आज रेल्वे स्टेशन जे मोकळे झाले आहेत, ते मनसेमुळे मोकळे झाले असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 


मात्र माझे कार्यकर्ते जेव्हा स्टेशन साफ करतात तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.


मुंबईत मोठ्या प्रमाणात बीएमसीचे काही अधिकारी आणि काही पोलीस फेरीवाल्यांकडून हफ्ते घेत असल्याच्या चर्चेने यामुळे पुन्हा जोर धरला आहे.