Maharashtra Crime News : महाराष्ट्रात घडलेल्या एका साध्या अपघतामुळे मोठ्या दरोड्याचे रहस्य उलगडले आहे. कर्नाटकात हा दरोडा पडला होता. 200000000 रुपयांचे सोने, करोडींचा रोकड आणि एक योगायोग. हा दरोडे खोर ज्या पद्धतीनो पोलिसांच्या हाती लाले तो घटनाक्रमक पाहिला असता कहानी एकदम फिल्मी वाटत आहे. जाणून घेऊया नेमकं काय घडले.
6 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता, कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील चडचन शहरातील एसबीआय शाखेत तीन मुखवटा घातलेले लोक घुसले. त्यांनी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आणि अंदाजे 1 कोटी रुपये रोख आणि सुमारे 20 किलो सोने घेऊन पळून गेले. पोलिसांनी चोरांचा शोध घेतला पण त्यांना ते सापडले नाहीत. त्यांनी सर्व आशा सोडल्या होत्या, पण नंतर असे काही घडले जे ज्याची कुणाला कल्पनाही नसेल,
चोरीला गेलेल्या सोन्याची किंमत बाजारात 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच एकूण 21 कोटी रुपयांच्या प्रकरणाचा समावेश आहे. 21 सप्टेंबर रोजी या प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्ट आला. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती गावात एका माणसाच्या व्हॅनचा किरकोळ अपघात झाला. स्थानिक लोकांची गर्दी लगेच जमली. तथापि, चालकाने अचानक पिस्तूल काढले आणि लोकांना धमकावत घटनास्थळावरून पळ काढला.
अपघातानंतर ड्रायवर वाहन आहे तिथे सोडून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना 21 पाकिटे सोने सापडले, एकूण अंदाजे 833 ग्रॅम होते. याव्यतिरिक्त, कारमध्ये 1 लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम देखील सापडली. याचा अर्थ पोलिसांना जास्त कष्ट करावे लागले नाहीत; सोने स्वतःहून त्यांच्याकडे आले.
1.5 किलो सोने आणि 44.25 लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी सोने आणि पैसे जप्त केले असले तरी, चोर अजूनही फरार होते. पोलिसांनी कारच्या मालकांना पकडण्याच्या आशेने संपूर्ण परिसरात शोध सुरू केला. दोन दिवसांच्या शोधानंतर, आणखी एक मोठा शोध लागला. एका बंद घराच्या छतावर एक बॅग सापडली. या बॅगेत 6.५४ किलो सोने आणि अंदाजे 41 लाख रुपये रोख होते. त्याच गावातील एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली जो कारमधील सोने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेला होता. त्याच्याकडून 1.5 किलो सोने आणि 44.25 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
आता पोलिसांनी संशयितांची नावे दिली आहेत: राकेश कुमार साहनी, राजकुमार पासवान आणि रक्षक कुमार. हे सर्वजण सुमारे 21-22 वर्षांचे आहेत. महाराष्ट्रातील रहिवासी असलेला चौथा आरोपी संपूर्ण दरोड्याचा सूत्रधार आहे. तो रेकी करण्यासाठी वारंवार बँकेत गेला होता आणि त्याने सोलापूर जिल्ह्यातून एक कारही चोरली होती, जी दरोड्यात वापरली गेली होती. उर्वरित तीन संशयितांना पोलिसांनी बिहारमधील समस्तीपूर येथून अटक केली होती, तर चौथ्याला 7 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात अटक करण्यात आली होती.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.