जालना : महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षांचे 25 आमदार नाराज असून ते विधीमंडळ अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. सध्या त्यांनी पक्षनेत्यांनी समजूत घातली असली तरी निवडणुका आल्या की हे आमदार भाजपमध्ये येतील, असे दानवे म्हणालेत. (25 MLAs of Maha Vikas Aghadi in touch with BJP, claims Raosaheb Danve)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीत नाराजी आहे. महाविकास आघाडीमधील 25 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. निवडणूक जवळ आल्यावर हे नाराज भाजपमध्ये दाखल होतील. सध्या त्यांची नाराजी दूर करण्यात आली तरी ते भाजपमध्येच येतील, असा दावा मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते भोकरदन येथे बोलत होते.


सत्ताधारी सरकारमधील 25 आमदार नाराज असून हे सर्व आमदार विधिमंडळ अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. आता निवडणूक आली की हे नाराज असलेले एकेक आमदार भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील, असे दानवे म्हणाले. हे नाराज आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. दानवे यांनी आज कुटुंबातील सदस्यांसह भोकरदन येथे होळी साजरी केली. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक आल्यानंतर हे नाराज आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी संकेत दिले.