मुंबई : कल्याण-डोंबिवली क्षेत्रात आज सर्वाधिक नव्याने कोरोनाबाधित 27 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे. आज वाढलेल्या रुग्णांमध्ये कल्याण पश्चिम 10, कल्याण पूर्व 6, डोंबिवली पश्चिम 4, डोंबिवली पूर्व 6, आंबिवली येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या 280 वर पोहोचली असून आतापर्यंत 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवली क्षेत्रात काल २० कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. धक्कादायक म्हणजे एका दोन महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची लागण झाली आहे.