दगडूशेठ हलवाई गणपतीवर ४० किलो सोन्याचे दागिने
ख-या अर्थानं श्रीमंत म्हणावं असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर यंदा 40 किलो सोन्याचे नाविन्यपूर्ण दागिने चढवले जाणार आहेत. साडे नऊ किलोचा रत्नजडित मुकुट, सातशे ग्रॅम वजनाचा शुंडहार, सूर्याचा किरणांचा आभास निर्माण करणारे दोन किलो सोन्याचे कान, आणि तब्बल 4 हजार सुवर्ण टिकल्यांचा अडीच किलोचा अंगरखा, कपड्यावर खडेकाम असलेलं साडे तीन किलोचं उपरणं, साडे साह किलोचं सोवळं त्याला पांढ-या खडयांचे कोंदण असलेला १ किलोचा हार असे दागिने साकारले आहेत.
पुणे : ख-या अर्थानं श्रीमंत म्हणावं असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर यंदा 40 किलो सोन्याचे नाविन्यपूर्ण दागिने चढवले जाणार आहेत. साडे नऊ किलोचा रत्नजडित मुकुट, सातशे ग्रॅम वजनाचा शुंडहार, सूर्याचा किरणांचा आभास निर्माण करणारे दोन किलो सोन्याचे कान, आणि तब्बल 4 हजार सुवर्ण टिकल्यांचा अडीच किलोचा अंगरखा, कपड्यावर खडेकाम असलेलं साडे तीन किलोचं उपरणं, साडे साह किलोचं सोवळं त्याला पांढ-या खडयांचे कोंदण असलेला १ किलोचा हार असे दागिने साकारले आहेत.
कपडयावर प्रथमच अशा प्रकारचे काम करण्यात आले आहे. याकरीता पु.ना.गाडगीळ अँड सन्सचे महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक येथील निष्णात ४० कारागिर गेल्या ५ महिन्यांपासून कार्यरत आहेत. बाप्पासाठी साकारलेले सुमारे ४० किलोचे सुवर्णालंकार घडविण्याकरीता सौरभ गाडगीळ व पराग गाडगीळ यांनी विशेष मेहनत घेतली आहे. याकरिता सुमारे १.२५ कोटी रुपये मजुरीचा खर्च आला आहे.