)
Mango Varieties in India : आंब्यांचा हंगाम ऐन तेजीत आला आहे. पावसाळा सुरु होण्याआधी भरपूर आंबे खायला मिळावेत असे प्रत्येकाला वाटत आहे. भारतात विविध राज्यात शेकडो प्रकारे आंबे पिकवले जातात. सर्वात जास्त लोकप्रिय आहे तो महाराष्ट्रातील कोकणचा हापूस आंबा. रसाळ, मधुर चवीमुळे अगदी पदेशातूनही कोकणच्या हापूसला मोठी मागणी आहे. कोकणचा हापूस हा जगप्रसिद्ध आहे. भारतात एक असा आंबा आहे जो त्याच्या किंमतीमुळे जास्त प्रसिद्ध आहे. हा आंबा इतका महाग आहे की इतक्या पैशांमध्ये कोकणातील एका मोठ्या बाागेतील सर्व आंबे विकत घेता. जाणून घेऊया भारतातील 5 सर्वात महागडे आंबे.
हे देखील वाचा...
मन तृप्त करणारा गोडवा, रसरशीत चव आणि मनमोहक सुगंध यामुळे आंब्याला फळांचा राजा म्हणून ओळखले जाते. भारत सर्वात मोठा आंबा निर्यातदार आहे. आंबा हे सर्वात जास्त महसूल मिळून देणारे फळ आहे. भारतात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे पिकले जातात. या आंब्यांच्या किंमती थक्क करणाऱ्या आहेत.
भारताच्या राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या nhb.gov.in या वेबसाइटने महागड्या आंब्यांची यादी जाहीर केली. भारतातील सर्वात महागड्या आंब्यांची लागवड मध्य प्रदेशमध्ये केली जाते.
हापूस आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. याची लागवड महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, कोकणचा हापूस हा सर्वात लोकप्रिय आहे. अनेक देशांमध्ये हापूस आंबा मोठ्या प्रमाणात निर्यात केला जाते. केशरी पिवळ्या धमक रंगामुळे देखील या आंबा वेगळा दिसून येतो. 2,000 ते 5,000 प्रती डझन दराने हा आंबा विकला जातो.
हा आंबा त्याच्या प्रचंड आकारासाठी प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशातील अलीराजपूरमध्ये आढळणारा हा आंबा एक फूट लांब वाढू शकतो. याची किंमत 500 ते 1000 रुपये प्रति नग आहे.
मुर्शिदाबादचा हा दुर्मिळ आंबा नवाबांचा आवडता आंबा मानला जात असे. हा आंबा साठवण्याची आणि कापण्याची पद्धत अतिशय विशिष्ट आणि नाजूक आहे. किंमत 1,500 ते 3,000 प्रति नग दराने हा आंबा विकला जातो.
दक्षिण भारतातील हा शाही आंबा त्याच्या मोठ्या आकारासाठी आणि अत्यंत कमी तंतुमय गरासाठी ओळखला जातो. त्याची चव मखमली असते.
मियाझाकी जगातील सर्वात महागडा आंबा आहे. मूळचा जपानचा असलेला हा आंबा आता भारतातील अनेक शेतकऱ्यांकडून यशस्वीपणे पिकवला जातो. हा आंबा माणिक-लाल रंगाचा आहे. बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि मध्य प्रदेशमध्ये हा आंबा पिकवला जातो. प्रति किलो अडीच लाख ते तीन लाख रुपये दराने हा आंबा विकला जातो. एवढ्या किंमतीत कोकमातील एखाद्या बागेतील सर्व आंबे खरदे करता येतील.