नाशिकमध्ये पतंग उडवताना 8 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. गणेशनगरमध्ये काठे गल्ली येथे सोमवारी ही दुर्घटना घडली आहे. नक्ष संदीप बनकर असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. रवींद्र विद्यालयात इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या नक्षचा दुर्दैवी अंत झाला आहे. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने बनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मकर संक्रांत जवळ आली की, मुलांना वेध लागतात ते पतंग उडवण्याचे. पंतग उडवण्याच्या नादात मुलं देहभान वि,रुन जातात. आजूबाजूला न पाहता ही मुलं पतंगच्या मागे पळतात किंवा उडवताना आपण किती उंचावर चढलो आहे याकडे दुर्लक्ष करतात. अशाच पद्धतीने नक्ष याचा करुण अंत झाला आहे.
इमारतीच्या गच्चीवरुन पडून नक्षचा मृत्यू झाला आहे. पतंग उडण्यासाठी नक्ष गच्चीवर गेला असता त्याचा पतंग उडवताना त्याचा तोल गेला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने बनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रत्येक मुलं वेगळं असतं तसंच त्याचं जगणं देखील वेगळं असतं.
पालकांनी मुलांची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं.
नकळत्या वयात आपण काय करतो आणि त्याचा काय परिणाम होईल याबाबत मुलं अनभिज्ञ असतात. या वयातच त्यांच्याकडून चुका होता.
याचा परिणाम इतका खोलवर होतो की, नक्षला आपला जीव गमवावा लागला.
नायलॉन मांजा प्रकरणी मुंबई पोलिसांनी 19 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच नायलॉन मांजाची विक्री अथवा त्याचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नायलॉन मांजा विरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसात मुंबई पोलिसांनी एकूण 19 गुन्हे दाखल केले आहेत. 35 हजारांचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.