जेवताना 9 वर्षांच्या लेकराच्या घशात काहीतरी अडकलं, पण त्या रिक्षाचालकामुळे आईच्या खांद्यावरच सोडले प्राण

Nashik News : जेवताना घशात काहीतरी अडकल्याने 9 वर्षांच्या मुलाला श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागला. आईने त्याला घेऊन डॉक्टरकडे धावली...   

नेहा चौधरी | Updated: Oct 15, 2025, 06:00 PM IST
जेवताना 9 वर्षांच्या लेकराच्या घशात काहीतरी अडकलं, पण त्या रिक्षाचालकामुळे आईच्या खांद्यावरच सोडले प्राण

Nashik News : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 9 वर्षांच्या लेकराला जेवायला घालत असताना त्याच्या घशात काहीतरी अडकलं आणि त्याची अवस्था वाटत होती. त्या मुलाला श्वास घेण्यास त्रास होत होता. आईने तडकाफडकी लेकराला खांद्यावर घेऊन जवळच्या डॉक्टरांचा दवाखाना गाठला. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी आईने मुला पालिका रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. पुढच्या सेकंदाला आई लेकराला खांद्यावर घेऊन दवाखान्याचा बाहेर आली आणि तिने एका रिक्षा चालकाला पालिका रुग्णालयात घेऊन जाण्यास विनंती केली पण त्याने नकार दिला. त्यानंतर जे घडलं अतिशय धक्कादायक होत. 

Add Zee News as a Preferred Source

नाशिकमध्ये त्या आईसोबत नेमकं काय झालं?

9 वर्षांच्या मुलाला आई नेहमी प्रमाणे जेवायला देत असताना त्याचा घशात अचानक काही तरी अडकलं. त्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याची अवस्था पाहून आईने त्याला खांद्यावर घेतलं आणि डॉक्टरांकडे घेऊन गेली. त्याची अवस्था पाहता डॉक्टरांनी तिला पालिकेच्या बिटको रुग्णालयात घेऊन जाण्याचा सूचना दिली. त्यामुळे आईने पुन्हा त्याला खांद्यावर घेतलं आणि दवाखान्याबाहेर आली. तिने रस्त्यावरील रिक्षा चालकांना विनवण्या केल्या की माझ्या बाळाला बरं नाही त्याला बिटको रुग्णालयात घेऊन जायचं आहे. पण तिला कुठल्याही रिक्षा चालकांनी माणुसकी दाखवली नाही. 

अन् हतबल झालेल्या आईची अवस्था नेमकं त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या भाजपचे नाशिक दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष भूषण शहाणे यांनी पाहिली. त्याने आपल्या दुचाकीवर त्यांना बिटको रुग्णालयलात घेऊन गेले. पण काळाचा घाला त्या मातेवर झाला. त्या लेकराने आईच्या खांद्यावर श्वास सोडला. रुग्णालयात दारावर लेकराने प्राण सोडल्यामुळे आईने हंबरडा फोडला. आईची ही अवस्था पाहून तिथे असलेल्या प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके चुकले. 

प्राण गमवलेल्या मुलाचं नाव प्रवीण सुरेश डगळे असं असून त्या आईचं नाव संगीता डगळे आहेत. खिरविरे गावातील संगीता मुलासह मराठा कॉलनीत पाहुणी म्हणून आली होती. 

FAQ

प्रश्न १: ही घटना कशाबाबत आहे?
उत्तर: नाशिकमधील ही धक्कादायक घटना आहे, ज्यात ९ वर्षांच्या मुलाला जेवताना घशात काही अडकले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आईने मदत मागितली, पण रिक्षाचालकांनी नकार दिला. भाजप नेत्याने दुचाकीने रुग्णालयात नेले, पण मुलाचा मृत्यू झाला.

प्रश्न २: घटना कुठे घडली?
उत्तर: ही घटना नाशिक शहरातील मराठा कॉलनी परिसरात घडली. आई संगीता डगळे खिरविरे गावातून पाहुणी म्हणून मराठा कॉलनीत आली होती.

प्रश्न ३: मुलाचे नाव आणि वय काय?
उत्तर: प्राण गमावलेल्या मुलाचे नाव प्रवीण सुरेश डगळे आहे. त्याचे वय ९ वर्षे होते.

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More