दहीसर टोलनाका स्थलांतरित होणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी डायरेक्टच म्हणाले...

दहीसरचा टोलनाका हटवण्याच्या शिंदेसेनेच्या प्रयत्नांना भाजपने ब्रेक लावला आहे. यामुळे आता दहीसरचा टोलनाका स्थलांतरित होणार की नाही अस प्रश्न निर्माण झाला आहे.   

वनिता कांबळे | Updated: Nov 17, 2025, 07:33 PM IST
दहीसर टोलनाका स्थलांतरित होणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी डायरेक्टच म्हणाले...

Dahisar Toll Naka Traffic:  मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर  दहिसर टोल नाका आहे. या टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो.  तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. यामुळे दहिसर टोल नाका तेथुन पुढे 2 किलोमीटर अंतरावर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. दहीसरचा टोलनाका आहे तिथेच राहणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या टोलनाका हटवण्याच्या प्रयत्नांना भाजपने ब्रेक लावला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

दहिसर टोलनाका स्थलांतराचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यानंतर वनमंत्री गणेश नाईकांसह भाजपने त्याला विरोध होत आहे. असे असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्सावे खाडी पुलापलीकडे राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका संयुक्तिक नसल्याचे स्पष्ट केल्याने टोलनाका स्थलांतराचा मार्ग बंद झाला आहे. 

दहिसर टोलनाक्यामुळे गेली अनेक वर्षे वाहतूककोंडीचा सामना मिरा-भाईंदर, वसई-विरारसह अन्य भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. टोलनाका हटवण्याच्या दृष्टीने अनेक आंदोलने झाली, मात्र टोलनाका काही हटला नाही. परिवहनमंत्री झाल्यावर सरनाईक यांनी टोलनाका हटवणारच, असे जाहीर करत प्रतिष्ठेचा विषय केला.

उपमुख्यमंत्री शिंदेंकडे बैठक घेऊन टोलनाका अन्यत्र हलवण्याचा निर्णय झाला. टोलनाका वरसावे महामार्गावर आणि नंतर वरसावे खाडीपूल पलीकडे नायगाव हद्दीत नेण्याबाबत मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. मात्र भाजपचे नेते वनमंत्री गणेश नाईक, भाजपचे माजी उपमहापौर चंद्रकांत वैती, भूमिपुत्र संघटना, काँग्रेसचे विजय पाटील आदींनी टोलनाका होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला. टोलनाका अन्यत्र उभारण्यास भाजपकडून विरोध होत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्री सरनाईक यांना पत्र देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील महामार्गवर टोलनाका उभारणीस नकार दिला.

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More