200 प्रवासी आणि 75 वाहनांना घेऊन जाणारी बोट विरारच्या समुद्रात अडकली; बोटीचा रॅम्प उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप तुटला आणि...

विरारच्या समुद्रात 200 प्रवासी आणि 75 वाहनांना घेऊन जाणारी बोट अडकली. यामुळे प्रवासी भयभित झाले. 

वनिता कांबळे | Updated: Oct 5, 2025, 08:08 PM IST
 200 प्रवासी आणि 75 वाहनांना घेऊन जाणारी बोट विरारच्या समुद्रात अडकली; बोटीचा रॅम्प उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप तुटला आणि...

Viirar Ro Ro Boat Accident :  विरारच्या समुद्रात रो रो बोट अडकल्याची घटना घडली आहे. बोटीचा रॅम्प उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप तुटला आणि बोट समुद्रात अडकली. या बोटीवर 200 पेक्षा जास्त प्रवासी आणि 75 वाहने होती. बोट अडकल्याने प्रवासी भयभित झाले. तताडीने बचाव पथक घटनास्तळी दाखल झाले. 

सफाळे–विरार दरम्यान सुरू असलेली रो-रो सेवा म्हारंबळपाडा जेटी जवळ समुद्रात अडकली. संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, क्षमतेपेक्षा अधिक तब्बल 200 पेक्षा जास्त प्रवासी आणि 75 पेक्षा अधिक वाहने या बोटीत होती. अचानक बोटीचा रॅम्प उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप तुटल्याने ही बोट समुद्रातच थांबली. 
तब्बल दोन तासांपेक्षा अधिक वेळ प्रवासी आणि वाहनधारक समुद्रातच अडकून आहेत, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.  या प्रकाराची माहिती मिळताच  तात्काळ प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले.  कोस्टगार्ड आणि स्थानिक यंत्रणा घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. सध्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

वसई विरार मधील खड्ड्यांविरोधात बहुजन विकास आघाडी आक्रमक

वसई विरार मधील खड्ड्यांविरोधात बहुजन विकास आघाडी आक्रमक झाली आहे. विरार येथील पालिकेच्या मुख्य कार्यालयाबाहेर आज बहुजन विकास आघाडीचे हजारो कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात आंदोलन केले. यावेळी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा व माजी आमदार हितेंद्र ठाकूर , माजी आमदार क्षितिज ठाकूर व माजी आमदार राजेश पाटील यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.. वसई विरार मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाहीये. त्यामुळे अनेक जणांचा अपघातात मृत्यू झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत.. तरी प्रशासनाला जाग येत नसल्याने पालिका प्रशासनाविरोधात बहुजन विकास आघाडीने आंदोलन केले. 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More