ST Bus Driver Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. एका एसटी चालकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एसटी कर्मचा-याने एसटीमध्ये चढू कसा? असा प्रश्न विचारत एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओत त्याने आपली व्यथा अगदी हसत हसत मांडली आहे.
एसटीच्या केबिनमध्ये ड्रायव्हरला चढण्यासाठी टप्पे बनवले आहेत मात्र गाडीचा दरवाजा एकीककडे आणि चढण्यासाठी बनवण्यात आलेले टप्पे दुसरीकडे अशी गत झालीय. त्यामुळे सांगा मी आत्ता गाडीत चढू कसा?? असा प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून एसटी ड्रायव्हरने विचारला आहे.
एसटी ड्रायव्हरने गंमतीशीर व्हिडिओ बनवत आपल्या समस्येला वाचा फोडली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारुन घेतला आहे. तसंच, हे अजब डोकं कोणाचं असा सवालदेखील केला आहे. ड्रायव्हरच्या एसटीबद्दल बोलत आहे ती शिवशाही आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत चालक बोलताना दिसत आहे की, पायरी एकीकडे आणि दरवाजा एकीकडे बसवला आहे. आता या पायरीवरुन मी गाडीत कसा चढू, असा हसत हसत सवाल तो करताना दिसत आहे. एसटी चालकाने जरी या सगळ्या प्रकारावर गमतीशीर सवाल केला असला तरी एसटी महामंडळाने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
एसटी महामंडळाने तयार केलेल्या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचे लोकेशन मोबाइलवर कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टॅन्डवर येण्याची वेळ समजणार आहे. एसटीच्या ताफ्यातील सर्वच गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीएलटी) बसविले असल्याने अॅपवर बसची माहिती उपलब्ध होणार आहे. राज्यभरात ५० हजार मार्गावर एसटीच्या सव्वालाख फेऱ्या होत असतात. यात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट काढूनही बस नेमकी कोणत्या ठिकाणी आली, मधल्या थांब्यावर एसटी नेमकी कधी येणार याची माहिती मिळत नाही.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
NZ
(20 ov) 175/7
|
VS |
SA
178/3(17.1 ov)
|
| South Africa beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 187/5
|
VS |
BRN
191/5(20 ov)
|
| Bahrain beat Qatar by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SCO
(19.4 ov) 152
|
VS |
ENG
155/5(18.2 ov)
|
| England beat Scotland by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.