पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह आढळल्याने खळबळ, प्लास्टिक पिशवी तोंडाला गुंडाळून...
Crime News: पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ उडाली आहे. औंध (Aundh) परिसरात ही घटना घडली आहे. पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Crime News: पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ माजली आहे. औंध (Aundh) परिसरात पती, पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळला आहे. पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
औंध परिसरात पतीने पत्नी आणि 8 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली आहे. पती आयटी अभियंत होता. त्याने पॉलिथिनची पिशवी तोंडाला गुंडाळून मुलगा आणि पत्नीचा खून केला. यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. औंध येथील डीपी रोड परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.
पतीचं नाव सुदिप्तो गांगुली असं असून टीसीएसमध्ये कामाला होता. त्याचा भाऊ बंगळुरुत वास्तव्याला आहे. भाऊ फोन उचलत नसल्याने तसंच त्याचाशी काही केल्या संपर्क होत नसल्याने त्याने मित्रांच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी घरी जाऊन पाहणी केली असता तिघांचे मृतदेह आढळले. पत्नी आणि मुलाचे नाव अद्याप समोर आले नाही. पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत.