'हा पत्रकार नाही...', निवडणूक आयोगाच्या PC मध्ये एकच गोंधळ, नंतर उघड झाला त्याचा राजकीय पक्ष, म्हणाला 'मला त्यांनीच...'

Local Body Election: राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून एका व्यक्तीने प्रश्न विचारल्यानंतर एकच गोंधळ उडाला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.   

शिवराज यादव | Updated: Nov 4, 2025, 09:57 PM IST
'हा पत्रकार नाही...', निवडणूक आयोगाच्या PC मध्ये एकच गोंधळ, नंतर उघड झाला त्याचा राजकीय पक्ष, म्हणाला 'मला त्यांनीच...'

Local Body Election: राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाने 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 2 डिसेंबर 2025 ला मतदान होणार असून, 3 डिसेंबर 2025 ला मतमोजणी होणार आहे. या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना दुबार मतदारांसंबधी प्रश्न विचारुन भांबावून सोडलं. यादरम्यान आयुक्तही गोंधळलेले दिसले. दरम्यान यादरम्यान एका व्यक्तीने प्रश्न विचारल्यानंतर गोंधळ उडाला. 

Add Zee News as a Preferred Source

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले '100 टक्के खात्री पटली की...'

 

राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाल्यानंतर पत्रकारांनी दुबार मतदारांवरुन प्रश्न विचारण्यात सुरुवात केली. आयुक्त या प्रश्नांवर उत्तरं देत असतानाच एका व्यक्तीने प्रश्न विचारला. ही व्यक्ती अचानक निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना प्रश्न विचारु लागल्याने सर्वजण थांबले. मात्र त्यावेळी ही व्यक्ती पत्रकार नाही सांगत इतर पत्रकारांनी आक्षेप घेतला. तुम्ही पत्रकार नसल्याने प्रश्न विचारु शकत नाही असं सांगत आक्षेप घेण्यात आला. यानंतर त्यांना थांबवण्यात आलं. नंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. 

ही व्यक्ती नेमकी कोण?

पत्रकार परिषदेत गोंधळ निर्माण करणाऱ्या या व्यक्तीचं नाव राजेश त्रिपाठी आहे. उत्तर भारतीय विकास सेना पक्षाच्या वतीने या व्यक्तीने प्रश्न विचारला होता. पत्रकारांनी हा पत्रकार नसल्याचं लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं आणि ताब्यात घेतलं. 

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख  - 10 नोव्हेंबर 2025
उमेदवारी अर्जसाठी अंतिम मुदत - 17 नोव्हेंबर
छाननी - 18 नोव्हेंबर
माघार घेण्याची मुदत - 21 नोव्हेंबर
मतदान - 2 डिसेंबर
मतमोजणी - 3 डिसेंबर
शासन अधिकृत निकाल - 10 डिसेंबर 

आचारसंहिता लागू

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता जरी नगरपरिषद, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात लागू असली तरी काही निर्णय, कार्यक्रम जर येथील मतदारांवर प्रभाव करणारे असतील तर तेदेखील आचारसंहितेमध्ये येईल असं सांगण्यात आलं आहे. 

विभागनिहाय नगरपरिषद - नगरपंचायत निवडणुका
कोकण - 27
नाशिक - 49 
पुणे - 60 
छत्रपती संभाजीनगर - 52
अमरावती - 45 
नागपूर - 55 

FAQ

1) नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची मतदान तारीख काय आहे?
मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होईल. 

2) मतमोजणी आणि निकाल कधी जाहीर होईल?
मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होईल आणि निकाल त्याच दिवशी जाहीर होतील.

3) मतदारांसाठी कोणत्या विशेष सुविधा आहेत?
मतदारांना मतदान केंद्र शोधणे, मतदार यादीत नाव तपासणे आणि उमेदवारांची माहिती पाहण्यासाठी विशेष मोबाईल अॅप लाँच केले जाईल.
स्त्री मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'पिंक बूथ' स्थापन केले जातील, जे महिला कर्मचारी आणि पोलिसांकडून चालवले जातील.
निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या ६६,७७५ पेक्षा जास्त असेल.
मतदार जागृती मोहिमा पारंपरिक आणि नवीन माध्यमांद्वारे चालवल्या जातील

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More