पती बेपत्ता झाल्याची पत्नीची तक्रार, तपास केला असता पोलीस हादरले, तिनेच बेशुद्ध होईपर्यंत त्याच्यासोबत...; तालुका हादरला

नांदेडमध्ये हत्येच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 15, 2025, 05:52 PM IST
पती बेपत्ता झाल्याची पत्नीची तक्रार, तपास केला असता पोलीस हादरले, तिनेच बेशुद्ध होईपर्यंत त्याच्यासोबत...; तालुका हादरला

नांदेड जिल्ह्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीने तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर पत्नीने पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी पत्नीचा मोबाईल सीडीआर तपासला असता, तिने एकाच व्यक्तीला अनेकदा फोन केल्याचं आढळलं. यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता गुन्हा उघडकीस आला आणि पोलिसांनी अटकेची कारवाई केली. 

Add Zee News as a Preferred Source

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला प्रियकराच्या मदतीने पुलावरून नदीत फेकून दिले. पतीने आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या नराधम पत्नीचा डाव मात्र पोलिसांनी उघडा पाडला. नांदेड जिल्ह्यातील किनवट मधील ही घटना आहे. 51 वर्षीय विनोद भगत हे गोकुंदा मध्ये पत्नी प्रियंकासोबत राहत होते. दोघांचा सुखी संसार सुरु होता. पण प्रियंकाचे सूत ब्रोकर म्हणून काम करणाऱ्या शेख रफिकसोबत जुळले. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने त्याचा काटा काढण्याचा कट दोघांनी रचला. 

29 ऑगस्ट रोजी विनोदला रफिकने खूप दारू पाजली आणि बेधुंद केलं. त्यांनतर प्रियंका आणि तिचा प्रियकर शेख रफिक याने विनोदला पैनगंगा नदीवरील खरबी पुलावर नेलं. दोघांनी विनोदला नदीत फेकून दिलं. 3 सप्टेंबर रोजी पत्नीने पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. विनोचा मृतदेह विदर्भातील महागाव येथे पैनगंगा नदीत सापडला. 

पण ही आत्महत्या नसून घातपात झाल्याचा संशय मयताच्या बहिणीने व्यक्त केला. पोलिसांनी पत्नीच्या मोबाईलचा सीडीआर तपासला असता एकाच व्यक्तीला अनेकदा फोन केल्याचं आढळून आले. शेख रफिक याला ताब्यात घेऊन पोलिसांनी खाक्या दाखवताच खुनाचा उलगडा झाला. या घटनेने किनवट तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More