)
Aaditya Thackeray: सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मुंबईत निर्धार मेळावा होणार आहे.. या मेळाव्याकडे सर्वांच लक्ष लागलंय. कारण या मेळाव्यात आदित्य ठाकरे मतदार यादीतील घोटाळा उघड करणार आहेत..
सोमवारी होणा-या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या निर्धार मेळाव्याकडे सगळ्याचंच लक्ष लागलंय. कारण या मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 'बोगस वोटिंग बॉम्ब' फोडणार आहेत. दिल्लीत राहुल गांधींनी ज्या प्रकारे प्रेजेंटेशन केलं अगदी तशाच प्रकारे आदित्य ठाकरे हे मुंबईतील मतदार यादीतील घोळाचं प्रेजेंटेशन करणार आहेत. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केलीये.
मतदार याद्यांमध्ये घोळ कशा पद्धतीने करण्यात आला याची माहिती ते निर्धार मेळाव्यात देणार आहेत.. इतकच नाही तर महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची याचंही मार्गदर्शन पदाधिका-यांना करणार आहेत..दरम्यान प्रेझेंटेशन सुरू होण्यापूर्वीच जनतेनं त्यांची पॉवर कट केलीये त्यामुळे आता कोणतं पॉवर प्रेझेंटेशन करणार असा खोचक सवाल भाजपनं त्यांना विचारलाय.
या निर्धार मेळाव्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील नेते विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख हे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत... आता या मेळाव्यात आणखी काय नवी माहिती आदित्य ठाकरे सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे