Torres jewellery Scam: टोरेसमधील 1000 कोटींचा गुंतवणूक घोटाळा उघड झाल्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी कंपनीत काम करणारा अकाऊंटंट अभिषेक गुप्ता याने याप्रकरणी अलर्ट दिला होता असं उघड केलं आहे. अभिषेक गुप्ताने मुंबई पोलीस तसंच सक्तवसुली संचलनालयाकडे (Enforcement Directorate) तक्रार दाखल केली होती. टोरेसमध्ये बेकायदेशीर गोष्टी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण आपण सांगूनही प्रशासनाकडे याकडे लक्ष दिलं नाही असा आरोप अभिषेख गुप्ताने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक गुप्ताने 30 डिसेंबरला पहिली तक्रार दाखल करत या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी काही अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. नवी मुंबई पोलिसांनी सानपाडातील स्टोअरमध्ये छापा टाकण्याची योजना आखली होती. पण त्याआधीच मुख्य आरोपी फरार झाला. दरम्यान अभिषेक गुप्ताने आपल्या धमकीचे फोन येत असल्याचा आरोप करत शिवाजी पार्क पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "अभिषेक गुप्ता धमक्यांचे फोन येत असल्याची माहिती देण्यासाठी भायखळा पोलीस ठाण्यातही गेला होता. दरम्यान मुख्य आरोपींनी आपल्या कर्मचाऱ्यांना स्टोअरमध्ये सोडून जाण्याआधीच मोठा मुद्देमाल लुटून नेल्याचं दिसत आहे. आम्ही अभिषेक गुप्ता खरं बोलत आहे की आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे याची माहिती घेत आहोत".
दरम्यान टोरेस कंपनीने अभिषेक गुप्ता आणि सीईओ तौसिफ रियाज दुकानाची तोडफोड करण्यात आणि लूट करण्यात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. यामुळे कंपनीचे गुंतवणूकदार त्यांच्या विरोधात गेले. दरम्यान फरार असलेला सीईओ तौसिफ रियाझ हा अल्पशिक्षित होता असंही उघड झालं आहे. त्याने दहावीची परीक्षाही दिलेली नव्हती. भायखळा येथील आधार केंद्रावर तो ऑपरेटर म्हणून काम करायचा असंही उघड झालं आहे. तसंच सीईओ दिसण्यासाठी तो फॉर्मल कपडे घालत असे.
दरम्यान टोरेस स्कॅमचे मास्टरमाईंड दोन युक्रेनिअन नागरिकांनी आणला होता. दरम्यान हा घोटाळा उघड होण्यापूर्वीच दोघे देश सोडून फरार झाले. व्हिक्टोरिया कोवालेन्को आणि ओलेना स्टॉईन हे दोन फरार युक्रेनिअन नागरिकांचा यामध्ये सहभागी होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.