रेमिडेसिवीर काळाबाजार करणा-याला कारावास
पाच वर्षे सश्रम कारवास आणि 5 हजारांचा दंडाची शिक्षा
नागपूर :कोरोनाच्या दुस-या लाटेदरम्यान ह़ॉस्पिटलमधील वॉर्ड बॉय म्हणून काम करणा-या तरुणावरील रेमिडेसिवीर चोरीचा आरोप सिद्ध झाल्यानं अतिरिक्त जिल्हा न्यायलयानं आरोपीला पाच वर्षे कारवास सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याच बरोबर पाच हजारांचा दंडाचीही शिक्षाही सुनावली आहे.शेख आरिष शेख रफिक ( नाव 22) असे आरोपीचे नाव आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेत गंभीर रुग्णांना रेमिडेसीवीर इंजेक्शनची गरज असताना त्याचा काळाबाजार झाल्याचे अनेक प्रकरणं उघडकीस आले. चढ्या दरानं रेमिडेसिवीर इंजेक्शनची विक्री होत होती. काही ठिकाणी रुग्णांकरिता आणलेले इंजेक्शन आरोग्य कर्मचार्यांनीच लंपास केल्याच्या घटनाही उघडकीस आल्यात.अशाच एका रेमडेसिवीर इंजेक्शन चोरीच्या प्रकरणातील आरोपीस जिल्हा सत्र न्यायाधीश पी.एम. घुगे यांनी सोमवारला पाच वर्षांच्या सर्शम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.आरीफ शेख वल्द रफीक शेख या आरोपीस 24 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. अंकित अशोक केसरी असे फिर्यादीचे नाव आहे. पाचपावली हद्दीतील होप हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटल करण्यात आले होते. फिर्यादी अंकित मॅनेजमेंट टीममध्ये नोकरी करतात. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रोज रुग्णांची संख्या पाहून जिल्हाधिकारी कार्यालयातून इंजेक्शनचा पुरवठा सुरू करण्यात आला. होप हॉस्पिटलचे रेमडेसिवीर इंजेक्शन व इतर औषध काही दिवसांपासून गायब होत असल्याने दररोज स्टॉफच्या सुटीच्या वेळेस तपासणी करण्यात येत होती. 24 एप्रिलला रात्री तपासणी सुरू असता हॉस्पिटलमध्ये काम करणारे आरीफ शेखची तपासणी केली असता त्याच्या बॅगेत काळ्या रंगाच्या पॉलिथीन बॅगमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन व इतर औषध मिळाले. इंजेक्शन व इतर औषध हॉस्पिटलच्या रुग्णांना देण्यासाठी देण्यात आले होते. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी अर्जुन राऊत यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.राज्य सरकारतर्फे अँड. ज्योती वंजानी यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम 381 मध्ये पाच वर्ष कारावास, कलम 420 मध्ये 2 वर्ष कारावास, कलम 3,7 जीवनावश्यक वस्तू कायद्यात 1 वर्ष शिक्षा, कलम 18 (सी), 27 (बी) ड्रग्स अँण्ड कॉस्मीस्ट अँक्टमध्ये 1 वर्ष कारावास, अशी शिक्षा ठोठावली.