Maharashtra Assembly Election Result 2024: विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीला धक्का देणारा ठरला आहे. महायुतीला 234 जागा मिळालेल्या असताना महाविकास आघाडी फक्त 50 जागा जिंकू शकली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना फक्त 20 जागा जिंकल्या असून, महाविकास आघाडीत सर्वात जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. निवडून येणाऱ्यांमध्ये आदित्य ठाकरेंचाही समावेश आहे. दरम्यान निवडणुकीनंतर घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी सुनावलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून घराणेशाहीवरुन टीका होत असल्याचं विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले. "थोडी तरी पातळी ठेवावी, थोडी तरी लाज बाळगावी. प्रत्येक वेळी बोलायचं आहे म्हणून बोलू नये. जो काही घोळ घातला आहे त्याची मजा घ्या". विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी जास्त भाष्य करण्यास नकार दिला. "सगळ्या गोष्टी बोलणं योग्य नाही. काही गोष्टींवर विचार सुरु आहे. योग्य वेळी आम्ही त्यावर बोलू". 


मोठी घडामोड! निवडून येताच दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, म्हणाले 'अजित पवार आणि त्यांच्यात...';


 


48 तास झाले कोण मुख्यमंत्री होतंय हे पाहूयात असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच शिंदेंच्या आमदारांकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी होत असल्याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "मग 133 जे जिंकून आलेत्यांचं काय होणार? मागच्या अडीच वर्षात काही मिळालं नाही, तसंच बसणार का?". 


आदित्य ठाकरे यांची Instagram पोस्ट


आदित्य ठाकरेंनी आपल्या वैयक्तिक विजयानंतर इन्स्टाग्राम स्टेटसमधून या विजयावर भाष्य केलं आहे. "पाठिंबा दर्शवणारे आणि आशिर्वाद देणारे मेसेज पाठवणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. सर्वांना रिप्लाय करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना रिप्लाय करतोय. मात्र कोणाला रिप्लाय करायचा राहून गेलं असेल तर मी माफी मागतो," असं आदित्य ठाकरेंनी पहिल्या दोन पॅरांमध्ये म्हटलं आहे. पुढे त्यांनी, "नक्कीच ही निवडणूक अपेक्षापेक्षा फारच वेगळी ठरली. तुमच्याकडून मिळणारा असा पाठिंबा आणि आशिर्वाद खरोखरच प्रेरणादायी आहेत," असंही म्हटलं आहे.


पोस्टच्या शेवटी आदित्य ठाकरेंनी, "आम्ही पुन्हा येऊ पूर्वीपेक्षा आणखी शक्तीशाली होऊ. सर्वांसाठी पूर्वीपेक्षा अधिक उत्तम राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही नक्कीच परत येऊ," असं म्हटलं आहे.