ज्ञानेश्वर पतंगे, धारशीव : पूजा खेडकरपाठोपाठ बनावट प्रमाणपत्र प्रकरणात आता राज्यातील आणखी एक आयएएस अधिकारी अडचणीत आला आहे. धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्या ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची चौकशी होणार आहे. केंद्र सरकराने राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत...सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या तक्रारीची दखल घेत हे आदेश देण्यात आले आहेत.
पूजा खेडकर प्रकरणानंतर आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. आणखी एक आयएएस अधिकारी अडचणीत आला आहे. OBC आरक्षणासाठी खोटं NCL प्रमाणपत्र सादर करुन सरकारी यंत्रणेला फसवणूक करूनआयएएसची खुर्ची मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. केंद्र सरकारनं तपासाचे आदेश दिले आहेत. पूजा खेडकर प्रकरण थंड होत नाही, तोच महाराष्ट्रातून आणखी एका आयएएस अधिकाऱ्याचा बोगस प्रमाणपत्र घोटाळा उघड आल्याने सरकारी यंत्रणेत खळबळ उडाली आहे. यामुळे सोलापूरचे आयुक्त सचिन छगनलाल ओंबसे अडचणीत सापडलेत आहेत. O
BC, NCL प्रमाणपत्रासाठी खोटी माहिती कागदपत्रं सादर केल्याचा आरोप आहे. सचिन ओंबसे यांचे वडील दहिवडीच्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांचा पगार वार्षिक 12 लाखांच्या घरात आहे. तरीदेखील NCL मिळकतीच्या अटींपेक्षा कमी उत्पन्न असल्याचे खोटे दाखवून ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतला आणि बेकायदेशीरपणे पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षा देऊन IAS झाले असा आरोप आहे. पहिले चारही प्रयत्न त्यांनी Open General मध्ये दिले. पण IAS पद न मिळाल्याने यंत्रणेला फसवून OBC NCL प्रमाणपत्र मिळवलं आणि पाचव्या प्रयत्नात IAS झाले. नियमानुसार OBC साठी उत्पन्न मर्यादा 4.5 लाख होती. पण ओंबसे कुटुंबाचं उत्पन्न त्याहून तिप्पट आहे.
केंद्र सरकारच्या DOPT विभागानं आता महाराष्ट्र सरकारला चौकशीचे आदेश दिलेत. ओंबसे यांचं NCL प्रमाणपत्र पुन्हा तपासून अहवाल सादर करण्याच्या सूचना या आदेशता देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी ही तक्रार केली होती. प्रमाणपत्र बोगस असल्यामुळे नोकरी रद्द करा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे चौकशीचा फास ओंबसे यांच्या गळ्यात चौकशीचा फास आवळला आहे.
BRN
(20 ov) 207/2
|
VS |
GER
161/8(20 ov)
|
Bahrain beat Germany by 46 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 192/4
|
VS |
MAW
120/7(20 ov)
|
Tanzania beat Malawi by 72 runs | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 144/8
|
VS |
GER
145/5(16.4 ov)
|
Germany beat Malawi by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.