महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात क्रांती! AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊसाचं यशस्वी उत्पादन

AI Technology: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर म्हणजेच AI तंत्रज्ञानावर कृषी क्षेत्रातही आमुलाग्र बदल होताना दिसत आहेत. 

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 12, 2025, 10:02 PM IST
महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात क्रांती! AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊसाचं यशस्वी उत्पादन
AI तंत्रज्ञान

AI Technology: बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावर कृषी क्षेत्रात वापर करताना उसाच्या पिकाची यशस्वी लागवड केली आहे. याची दखल मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रयोगाचं कौतुक केलंय. 

Add Zee News as a Preferred Source

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर म्हणजेच AI तंत्रज्ञानावर कृषी क्षेत्रातही आमुलाग्र बदल होताना दिसत आहेत. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रामध्ये या तंत्रज्ञानाद्वारे ऊसाची लागवड करण्यात आलीय. या संशोधनाची दखल मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांनी घेतलीय. सत्या नाडेला यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. त्यामुळे अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळतंय.

भविष्यातील शेती कशी असेल, याला डोळ्यासमोर ठेवून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शेतीचा प्रयोग बारामतीमध्ये केलाय. राज्यातील 1000 शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊस पिकावर  एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. 

16 ते 20 जानेवारीदरम्यान बारामतीतील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट इथं कृषी प्रदर्शन आयोजित आयोजित केलंय. यामध्ये भविष्यातील शेती कशी असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर केलेला ऊस आणि इतर पिकं याची प्रात्यक्षिकं शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहेत. बारामतीच्या या कामगिरीचं सातासमुद्रापार कौतुक झाल्यानं अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More