ST Fare Hike: एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे, असं म्हटलं जातं. एसटी महामंडळाचा 15% भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला असून आज प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार, अशी सूत्रांनी माहिती दिलीय. मध्यरात्रीपासून एसटीच्या भाडेवाढीची शक्यता आहे. गेली 3 वर्षे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे दरवर्षी 5 टक्के प्रमाणे तीन वर्षांची 15 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळानं दिलाय. भाडेवाढ झाल्यानंतर राज्यातील जनतेसाठी एस.टी.चा प्रवास 60 ते 80 रुपयांनी महागणार आहे.
दुसरीकडे गेल्या तीन वर्षात एसटी भाडेवाढ करण्यात आलेली नाही. एसटी बस प्रवाशांची संख्या वाढलीय. अशातच नव्या सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या संभाव्य भाडेवाढीचे संकेत दिलंय. पण दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे एसटीच्या संभाव्य भाडेवाढीवरून मंत्रिमंडळातच विसंवाद पाहायला मिळत आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दरवाढीचे संकेत दिले आहेत. लवकरच एसटीच्या दरवाढीबाबत निर्णय घेऊ असं प्रताप सरनाईकांनी सांगितलंय. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाडेवाढीची शक्यता फेटाळली आहे. मंत्रिमंडळासमोर असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं अजित पवार म्हणाले.
एसटीच्या संभाव्य भाडेवाढीवरून महायुती सरकारमध्येच विसंवाद असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एसटीच्या संभाव्य भाडेवाढीबाबतचे संकेत दिलेत. लवकरच दरवाढीबाबत निर्णय घेऊ, असंही सरनाईकांनी म्हटलंय.
दिवसेंदिवस खर्च वाढत आहेत. दरवर्षी डिझेल आणि सीएनजीच्या किमती देखील वाढत आहेत. खर्च वाढत असल्याने एसटी महामंडळामध्ये भाढेवाढ करणे अपरिहार्य असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते. मागच्या तीन ते चार वर्षांच्या कार्यकाळात एसटी महामंडळात भाडे वाढ झालेली नाही. त्यामुळे कदाचित या बैठकीमध्ये भाडेवाढीचा विषय निघू शकतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी चर्चा समोर आल्यानंतर त्यावर चर्चा होणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितलं होतं.
परिवहन मंत्री एसटी भाडेवाढीची भाषा करताहेत. मात्र अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी याबाबतचा प्रस्तावच आला नसल्याचं म्हटलंय. चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलंय. पण एसटीच्या दरवाढीवरून मंत्रीमंडळातच विसंवाद आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
एसटी महामंडळाच्या ज्या बसेस आहेत त्या चांगल्या पुरवणाच्या संदर्भात प्रयत्न करावा लागणार असल्याचे ते अजित पवार यांनी म्हटले आहे. भाढेवाढ करायची म्हटले तर बसेस खराब असतील तर कशाची भाडेवाढ? असा प्रश्न लोक विचारतील. त्यामुळे चर्चा करून यातून योग्य तो मार्ग काढणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलंय.
दुसरीकडे एसटीच्या संभाव्य भाडेवाढीच्या वादात विरोधकांनीही उडी घेतलीय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला जोरदार टोला लगावलाय. आम्ही दरवाढ होऊ देणार नसल्याचा निर्धारच रोहित पवारांनी बोलून दाखवला.
एसटी महामंडळानं 2 ते 3 कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा कमी करण्यासाठी स्वयंचलित भाडे सुधारणा सूत्राअंतर्गत भाडेवाढीची मागणी केली होती. गेल्यावर्षी हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडं पाठवण्यात आला होता. मात्र एसटीची लालपरी ही राज्यातील गोरगरिबांचं सर्वसमान्यांचं प्रवासाच महत्वाचं साधन आहे. त्यामुळे एसटीची दरवाढ करताना सरकारने पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.