Rupali Chakankar Vs Anjali Damania: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवरून टीकेची झोड उठवली. यावर पक्षाच्या महिलाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी संवेदनशील प्रत्युत्तर दिले, पण दमानिया यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून पुन्हा हल्लाबोल केला. सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या शब्दयुद्धाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणावर सडकून टीका केली होती. "महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास आहेत. त्यांना अर्थव्यवस्था खरंच समजते का?" असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या कर्जाच्या ओझ्यावर (9.32 लाख कोटी) भाष्य केले. माहितीचा अधिकार कायदा (आरटीआय) पूर्ववत करण्याची गरज आहे, ज्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि लोकशाही मजबूत होईल, असे त्या म्हणाल्या होत्या.
आदरणीय अजित दादा पवार यांच्या वडिलांचे हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्या वेळी अजितदादा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते.वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्ध्यात सोडले.त्यामुळे कोणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 12, 2025
रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांच्या शिक्षण सोडण्यामागील दुःखद कारण सांगितले. "अजित दादांच्या वडिलांचे हृदयविकाराने अकस्मात निधन झाले. तेव्हा ते कोल्हापूरमध्ये अभ्यास करत होते. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले," असे त्या म्हणाल्या. असे असले तरी त्यांनी शेती, पोल्ट्री आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवले असल्याचे म्हणत चाकणकरांनी पवारांच्या व्यावहारिक बुद्धिमत्तेची प्रशंसा केलीय. गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिलेला आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत. त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टीकोनामुळेच, असे म्हणत रुपाली चाकणकरांनी अजित पवारांच्या कार्याचे कौतुक केलंय.
मग अजित पवारांनी कृषी मंत्री जरूर व्हावे.
अर्थ मंत्रालय, हा खूप महत्वाचा आणि अतिशय गंभीर आहे.
ह्यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास / ज्ञान असणे आवश्यक आहे.
स्वित्झर्लंड हा देश ४१२८५ चौ किमी आहे आणि महाराष्ट्र ३०७७१३ चौ किमी आहे. म्हणजे आपले महाराष्ट्र… https://t.co/yE1hJSODWQ
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) October 13, 2025
रुपाली चाकणकर यांचे ट्विट रिट्विट करत दमानिया यांनी संताप व्यक्त करत म्हटले, मग अजित पवारांनी कृषी मंत्री जरूर व्हावे. अर्थ मंत्रालय, हा खूप महत्वाचा आणि अतिशय गंभीर आहे. ह्यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास / ज्ञान असणे आवश्यक आहे. स्वित्झर्लंड हा देश 41285 चौ किमी आहे आणि महाराष्ट्र 307713 चौ किमी आहे. म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य हे स्वित्झर्लंड या देशाच्या तुलनेत 8 पट मोठे आहे. स्वित्झर्लंड ची GDP 8333000 कोटी आहे आणि महाराष्ट्राची 4267000 कोटी आहे, म्हणजे अर्ध्याने.महाराष्ट्रावर कर्ज आता 932000 कोटी आहे. ते कसे कमी होणार ? काही ब्लू प्रिंट आहे का? असा सवाल उपस्थित करून त्यांनी पवारांच्या क्षमतेवर शंका घेतली.
१. अंजली दमानिया आणि रुपाली चाकणकर यांच्यातील वादाचे कारण काय आहे?
उत्तर: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणावर टीका करत, "महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास आहेत, त्यांना अर्थव्यवस्था समजते का?" असा प्रश्न उपस्थित केला. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पवारांचे शिक्षण अर्धवट सोडण्यामागील वैयक्तिक कारण सांगत त्यांच्या व्यावहारिक बुद्धिमत्तेचे समर्थन केले. यानंतर दमानिया यांनी पुन्हा अर्थमंत्रालयाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यामुळे सोशल मीडियावर शब्दयुद्ध रंगलं.
२. रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांचा बचाव कसा केला?
उत्तर: रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या वडिलांचे हृदयविकाराने अकस्मात निधन झाल्याने त्यांना कोल्हापूरमधील शिक्षण अर्धवट सोडावे लागले. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी त्यांनी शेती आणि पोल्ट्री व्यवसायात यश मिळवले. चाकणकरांनी पवारांच्या गणिती कौशल्याची आणि इन्फ्रास्ट्रक्चरमधील अभ्यासाची प्रशंसा केली, तसेच त्यांच्या दूरदृष्टी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापराच्या आग्रहाचे कौतुक केले.
उत्तर: अंजली दमानिया यांनी चाकणकरांचे ट्विट रिट्विट करत संताप व्यक्त केला आणि म्हटले की, अजित पवारांनी कृषीमंत्री व्हावे, कारण अर्थमंत्रालयासाठी अर्थशास्त्राचे सखोल ज्ञान आवश्यक आहे. त्यांनी महाराष्ट्राची जीडीपी (४२.६७ लाख कोटी) स्वित्झर्लंडच्या तुलनेत अर्धी असल्याचे आणि राज्यावरील ९.३२ लाख कोटींचे कर्ज कमी करण्यासाठी ठोस आराखड्याचा अभाव असल्याचे सांगत पवारांच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.