दादांचे माजी आमदार भाजपच्या गळाला, फडणवीसांसोबत नेत्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती

सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सोलापुरात दादांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसणार आहे. 

पूजा पवार | Updated: Oct 17, 2025, 09:26 PM IST
दादांचे माजी आमदार भाजपच्या गळाला, फडणवीसांसोबत नेत्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती
(Photo Credit : Social Media)

अभिषेक आदेप्पा, (प्रतिनिधी) सोलापूर : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात इनकमिंग सुरूय. मात्र, भाजपनं आता आपल्या मित्रपक्षांना धक्के द्यायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. कारण सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सोलापुरात दादांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सोलापुरात महायुतीमध्ये वादाची चिन्ह आहेत. कारण भाजप सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याची शक्यता आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सूत्र फिरवली असून दादांचे तीन माजी आमदार आणि काँग्रेसचे एक माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत या नेत्यांची वर्षा निवासस्थानी गुप्त बैठक झाल्याची देखील माहिती आहे.

लवकरच राज्यात पालिका निवडणुकींचं बिगुल वाजणारय. त्यामुळे  राजकीय हालचालींना देखील वेग आलाय. दादांचे आणि काँग्रेसचे आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आलाय. दरम्यान यावर खुद्द काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.

येत्या काही दिवसात निवडणुकींचा धुराळा उडणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झालीय. राज्याच्या विकासाचा ध्यास घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करतायत. त्यामुळे इतर पक्षातील नेते विकासाच्या संकल्पनेतून भाजपात प्रवेश करत असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जयकुमार गोरेंनी विरोधीपक्ष आणि मित्रपक्षांनाच धक्के द्यायला सुरूवात केलीय. सोलापुरात दादांना मोठा धक्का भाजपकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. तर तिकडे दौंडमध्ये अजित पवारांनी देखील भाजपच्या माजी शहराध्यक्ष स्वप्नील शाहांना भाजपातून फोडत राष्ट्रवादीत घेतलंय. त्यामुळे महायुतीमध्ये सुरू असलेल्या या फोडाफोडीच्या राजकारणामुळे दिवाळीत वादाचे फटाके फुटण्याची शक्यता बळावली आहे. 

FAQ : 

आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये काय राजकीय हालचाली सुरू आहेत?
उत्तर: सोलापूरमध्ये महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर 'इनकमिंग' सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील नेते भाजपमध्ये सामील होण्याच्या चर्चा जोरात आहेत, ज्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

 कोणत्या माजी आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत?
उत्तर: सोलापूरमधील चार माजी आमदार भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राजन पाटील, यशवंत माने, बबन शिंदे आणि काँग्रेसचे दिलीप माने यांचा समावेश आहे. काही सूत्रांनुसार, हे नेते शरद पवार गटातील असल्याचीही चर्चा आहे.

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची यात भूमिका काय आहे?
उत्तर: पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या फोडाफोडीला चालना दिली असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या सूत्रसूचनेवरून हे नेते भाजपमध्ये येणार असून, त्यांनी विरोधी आणि मित्रपक्षांना धक्के देण्याची मोहीम सुरू केली आहे.

About the Author