जावेद मुलाणी, झी मीडिया, बारामती : अजित पवारांच्या भीषण विमान अपघाताला एक महिना होत असतानाच आता त्यांच्या संशयास्पद विमान अपघाताच्या चौकशीला वेग मिळावा अशीच मागणी पवार कुटुंबीय आणि अजित पवारांच्या निकटवर्तींयांकडून करण्यात येत आहे. एकीकडे बारामती तालुका पोलीस स्टेशन समोर आमदार रोहित पवार हे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आले असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आता ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल आल्याची माहिती देण्यात आल्यानं या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली. (Baramati News)
अजित पवार विमान अपघातप्रकरणी ब्लॅक बॉक्सची माहिती समोर आल्यानं कोणीही तपासाबाबत विसंगती निर्माण करू नये असं देखील त्यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक किरण गुजर, नगराध्यक्ष सचिन सातव, तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्या उपस्थितीत बारामती शहरातील शारदा प्रांगण येथील राष्ट्रवादी भवन येथे ही पत्रकार परिषद घेण्यात आली. (Kiran Gujar on Ajit Pawar Plane Crash Black Box)
'कालच डीजीसीए आणि एएआयबी यांचा काल ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल आला आहे. पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी यांनी केलेली आहे. त्या संदर्भातली कार्यवाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केली आहे. किंबहुना 11 फेब्रुवारी रोजी जय पवार यांनी देखील मागणी केली होती. त्यावर कालच अहवाल येऊन कार्यवाही सुरू झाली आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मागणी करतो की त्या तपासाला गती मिळावी, सीबीआय चौकशी देखील गतिमान रितिने व्हावी आणि त्या संदर्भातला अहवाल येऊन योग्य ती कार्यवाही व्हावी', असं गुजर म्हणाले.
ज्यांच्या विरोधात हा अहवाल समोर येईल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची आमची देखील मागणी अशी ठाम भूमिका मांडत कोणत्याही मागणीच्या अहवालाला विलंब होतो. हे आपल्या हातात नसून यासाठीची स्वतंत्र यंत्रणा असून तपास करताना टेक्निकल बाजू देखील तपासावे लागतात, याची स्पष्टोक्ती त्यांनी केली. विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत बातम्या खऱ्या किंवा खोट्या हे आपल्याला माहिती नव्हतं मात्र नुकताच हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल आला असल्यानं तो ग्राह्य धरावा अशी मागणी गुजर यांनी केली.
आमदार रोहित पवार यांच्याप्रमाणंच आपल्या पक्षाचीही तशीच मागणी असून, सुनेत्रा पवारही या मागणीवर ठाम असल्यानं त्या संदर्भातली कार्यवाही मुख्यमंत्री फडणवीस करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करत तपासात विसंगती न होता गती मिळावी विसंगती होऊ नये संभ्रम निर्माण होऊ नये हीच आमची मागणी असल्याचा पुनरुच्चार केला.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More
LIVE|
LES
54/9(18 ov)
|
VS |
BOT
|
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 255/5
|
VS |
NZ
159(19 ov)
|
| India beat New Zealand by 96 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
BRN
(20 ov) 130/7
|
VS |
MAS
128(19.5 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 2 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 140/7
|
VS |
BRN
106(18.5 ov)
|
| Malaysia beat Bahrain by 34 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.