'अजित पवारांना न्याय द्या', म्हणत बारामतीकर रस्त्यावर; रोहित पवारांच्या मागण्यांवर वडील राजेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Accident : अजित पवार यांच्या अपघाती निधनाला महिना होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा संशयास्पदरित्या झालेला विमान अपघात पाहता त्याची एफआयआर दाखल करून घेण्याची मागणी जोर धरत आहे.   

सायली पाटील | Updated: Feb 26, 2026, 10:13 AM IST
'अजित पवारांना न्याय द्या', म्हणत बारामतीकर रस्त्यावर; रोहित पवारांच्या मागण्यांवर वडील राजेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
ajit pawar plane crash mla rohit pawar to visit baramati will lodge fir on accidental death of ncp leader rajendra pawar reaction

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Accident : आमदार रोहित पवार गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी बारामती दौऱ्यावर असून, बारामती तालुका पोलीस ठाण्यात जात तिथं ते दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. यावेळी युगेंद्र पवारही त्यांच्यासोबत दिसले. अजित पवार विमान अपघातप्रकरणी DGCA  आणि VSR कंपनीविरोधात FIR दाखल करुन घेण्यास मरीनलाईन्स पोलिसांनी नकार दिला, तिथं पोलीस आणि रोहित पवार यांच्यात बाचाबाची झाल्याचंही पाहायला मिळालं. गुन्हा दाखल न करुन घेतल्याने मरीन लाईन्स पोलिसांवर कुणाचा दबाव आहे? असा सवाल आमदार रोहित पवारांनी केला. ज्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. 

Add Zee News as a Preferred Source

रोहित पवार बारामतीत येत गुन्हा दाखल करत असतानाच त्यांचे वडील राजेंद्र पवार हेसुद्धा त्यांच्या साथीला असून, बारामतीकरांनीसुद्धा नेहमीप्रमाणंच पवार कुटुंबाला साथ देत या अपघाताच्या चौकशीची, एफआयआर दाखल करून घेण्याची मागणी उचलून धरली. बारामती पोलीस स्थानकाबाहेर मोठ्या संख्येनं अजित पवार समर्थक पोहोचले आणि तिथं घोषणाबाजी करत फिर्याद दाखल झालीच पाहिजे अशीच ठाम भूमिका मांडली. 

'किमान म्हणणं ऐकून घेतलं '

राजेंद्र पवार म्हणाले, 'जिथं ही घटना घडली, त्यासाठी एफआयआरची मागणी आता सर्व आंदोलक करणार असून, त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ज्या पद्धतीनं नागरिकांना न्याय मिळत नाहीये आणि ज्या पद्धतीनं हे सरकार चालवलं जात आहे ते योग्य नाही असं वाटतंय. न्याय मिळालाच पाहिजे, किमान म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, त्यानंतर कायदेशीर बाबी मांडाव्यात. मी सर्वसामान्य बारामतीकर आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी इथे आलो आहे. जे काही घडलं असेल त्याचा सरकारनं शोध घेत सत्य नागरिकापुढे आणलं पाहिजे, कारण लोकं अजूनही त्या धक्क्यातून बाहेर पडलेली नाहीत', 

दरम्यान, बारामतीच नव्हे, तर पुण्यातही आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन केलं जातंय....  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलंय... अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणातील दोषींवर FIR नोंदवला जावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More