Ajit Pawar Death One Month Home Condition: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधानाला आज एक महिना झाला. आजच्याच दिवशी जानेवारी महिन्यात, बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातामध्ये अजित पवारांसहीत पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे. अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी अपघातानंतर पुढील काही दिवसांमध्येच या अपघातासंदर्भात शंका उपस्थित केली. अजित पवारांचे पुतणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांनीही अनेकदा पत्रकारपरिषदा घेऊन या विमान अपघाताबद्दल शंका उपस्थित केली आहे. अशातच आज या अपघाताला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबाची काय स्थिती आहे याबद्दल अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी लिहिलेल्या विशेष पोस्टमध्ये नमूद केली आहे.
युगेंद्र पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे वाचूयात जसच्या तसं...
प्रिय काका,
आज तुम्हाला जाऊन एक महिना झाला… माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी, हा एक महिना आयुष्यातला सर्वात जड आणि सर्वात वेदनादायी ठरला.
आजही तुमच्या नसण्याची जाणीव मनाला होत नाही. तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाल, “मी कामाचा माणूस आहे, आणि हे काम असंच झालं पाहिजे!” असा भास होतो. सतत वाटत राहते आता तुमची गाठ पडेल… आणि तुम्ही म्हणाल, "काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे? थांब थोडं, लोकांना भेटतो पहिले. मग आपण बोलू…” पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जाते. आता मी तुमचे मार्गदर्शन कसे घेऊ...?
आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत. त्या आजही तुमच्या विश्वात रमण्याचा प्रयत्न करतात. काका, तुम्ही आजीची काळजी करू नका, आम्ही सर्वजण त्यांची काळजी घेत आहोत.
बाबा इतके भावूक झाले आहेत की, त्यांचा बांध केव्हाही फुटतो. त्यादिवशी गाडीतून प्रवास करताना अचानक त्यांचे डोळे पाणावले. ते उद्विग्नपणे म्हणाले, “दादा असा कसा जाऊ शकतो? अजून बरंच काही बोलायचं होतं…” आदरणीय साहेबही तुमच्याशिवाय अस्वस्थ झाले आहेत.
काका, अपघाताबद्दलच्या अनेक शंका मनाला छळत आहेत. अपघात कसा काय होऊ शकतो? नेमकं काय घडलं? कोणामुळे घडलं? सत्य काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत.
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात तुमचा आवाज पुन्हा घुमणार नाही, तुमचा तो प्रभावी आवाका दिसणार नाही. यावर अजूनही विश्वास बसत नाही.
तुम्ही गेलात… काका तुम्ही महाराष्ट्राला पोरकं करून गेलात...
नक्की वाचा >> अजित पवारांच्या निधनाला एक महिना पूर्ण! रोहित पवारांनी शेअर केला 28 जानेवारीचा Whatsapp Screenshot
काका, तुम्ही शरीराने आमच्यात नसला तरी तुमची शिकवण, तुमचा ध्यास, तुमचा जनतेवरचा विश्वास आणि जनतेचा तुमच्यावरचा विश्वास आणि प्रेम कायम आहे.
मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही सुरू केलेलं काम, जनतेला दिलेला विश्वास आणि विकासाचा घेतलेला वसा कधीही थांबू देणार नाही.
तुमचा मार्गच आमचा मार्ग असेल.
तुमचं स्वप्नच आमचं ध्येय असेल.
तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही… मीस यू काका...
तुमचाच,
युगेंद्र
प्रिय काका,
आज तुम्हाला जाऊन एक महिना झाला… माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी, हा एक महिना आयुष्यातला सर्वात जड आणि सर्वात वेदनादायी ठरला.
आजही तुमच्या नसण्याची जाणीव मनाला होत नाही. तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाल, “मी कामाचा माणूस… pic.twitter.com/mAiXT6YJIC
— Yugendra Shrinivas Pawar (@yugendraspeaks) February 28, 2026

दरम्यान, दुसरीकडे रोहित पवारांनीही आपल्या खास पोस्टमध्ये अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशी अपघातानंतर पुढल्या दहा मिनिटांमध्ये व्हॉट्सअप कॉल केला होता, हे दाखवणारा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NZ
(20 ov) 159/7
|
VS |
ENG
161/6(19.3 ov)
|
| England beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 256/4
|
VS |
ZIM
184/6(20 ov)
|
| India beat Zimbabwe by 72 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 176/8
|
VS |
SA
177/1(16.1 ov)
|
| South Africa beat West Indies by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.