अमरावती विद्यापीठाच्या परीक्षामध्ये पुन्हा गोंधळ

सर्वर डाऊन होत असल्याने लॉगिन होत नसल्याचा आरोप 

Updated: Oct 20, 2020, 04:55 PM IST
अमरावती विद्यापीठाच्या परीक्षामध्ये पुन्हा गोंधळ title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावतीच्या परीक्षा मागील दोन वेळा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट असतानाच पुन्हा एकदा विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. आज सकाळी दहा वाजता पासून सुरू झालेल्या परीक्षेसाठी बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे लॉगीनच होत नसल्याचा आरोप परीक्षार्थीं विद्यार्थ्यांनी केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा मोठा गोंधळ उडाला.

संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती अंतर्गत अमरावती विभागातील सुमारे एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देतायत. परंतु सर्वर डाऊन होत असल्याने लॉगिन होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आतापर्यंत अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर या वर्षी विद्यापीठाच्या परीक्षाला उशीर झाला आहे. त्यानंतर मागील एक आठवड्यापूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा होणार होत्या परंतु त्या ही परीक्षा रद्द झालेल्या होत्या. 

त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट होती. विद्यापीठाने जारी केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार आज विद्यापीठाच्या परीक्षेला दहा वाजल्यापासून सुरुवात होणार होती. त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारी देखील केली होती. पण परिक्षेच्या वेळेसच लॉगिन होत नसल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. तर संपूर्ण सर्वर डाऊन असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.