Ambadas Danve Cash Bomb: अंबादास दानवेंनी महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर महायुतीमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळतंय. दानवेंच्या आरोपांनंतर महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंवर आरोप केले होते. मात्र, आता सुनील तटकरेंनी देखील या वादात उडी घेतली असून महेंद्र दळवींना खोचक टोले लगावले आहेत.
अंबादास दानवेंच्या कॅश बॉम्बनंतर महायुतीमध्ये वादाचे फटाके फुटतायत. दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओनंतर महेंद्र दळवींनी या प्रकरणात सुनील तटकरेंना ओढलं. दरम्यान यानंतर आता सुनील तटकरेंनी देखील महेंद्र दळवींवर पलटवार केलाय. सुनील तटकरेंनी महेंद्र दळवींना खोचक टोले लगावले आहेत. दळवी हे निरागास आणि निष्पाप नेते आहेत, त्यांच्यावर बेछूट आरोप करण्यात आल्यानं या प्रकरणाचा NIA नं तपास करावा अशी मागणी करत तटकरेंनी दळवींना शालजोडे मारले.
महेंद्र दळवी थोर विचारवंत आहेत, त्यांच्यावर केलेले आरोप म्हणजे देशाच्या एकात्मतेवर घाला आहे, असाही टोला तटकरेंनी दळवींना लगावलाय. अंबादास दानवेंनी देखील या प्रकरणाची चौकशी सीबीआय, आयबी आणि रॉकडून करण्यात यावी अशी मागणी करत दळवींना टोले लगावले आहेत.
अंबादास दानवेंनी व्हिडिओ ट्विट करत महेंद्र दळवी यांच्यावर आरोप केलेत. यानंतर या व्हिडिओवर स्पष्टीकरण देत महेंद्र दळवींनी व्हिडिओ मॉर्फ केल्याचा दावा केलाय. दरम्यान यानंतर महेंद्र दळवी यांनी या प्रकरणात अंबादास दानवेंना नोटीस देखील पाठवलीय.
अंबादास दानवेंनी पैशांच्या बंडलासोबतचा एक व्हिडिओ ट्विट करत दळवींना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडे या प्रकरणावरून कोकणातील दोन कट्टर विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं.. महेंद्र दळवींनी या प्रकरणात सुनील तटकरेंचं नाव घेतलं आणि पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार जुंपली, सुनील तटकरेंनी मजेशीर पद्धतीनं टोले लगावत महेंद्र दळवींचा समाचार घेतला.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.