Ambernath Crime News : महाराष्ट्रात चाललंय काय? असं म्हणण्याची वेळ आली आहे. अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करणारा हल्लेखोर जितेंद्र पवार याने थेट पोलिसांना ओपन चॅलेंज दिले आहे.
"मला शोधणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस" अशी फेसबुक स्टोरी ठेवत पोलिसांना खुलं आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता पोलीस त्याला कधी पकडतात, याकडे अंबरनाथचं लक्ष लागलं आहे
आरोपी जितेंद्र पवार याने सोमवारी अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर हल्ला केला. भरदिवसा दोन गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर जितेंद्र पवार हा पसार झाला आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मात्र पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथकं रवाना झाली आहेत.
पोलिसांचे पथक जितेंद्र पवारचा शोध घेत असतानाच आता जितेंद्र पवार याने फेसबुकवर स्टोरी टाकत पोलिसांना आव्हान दिले आहे. "मला शोधणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस.. अंबरनाथ शहराला एकच भीती टायगर भाईचे नंबरकारी किती" असं आव्हान दिलं आहे. हे पोलिसांना खुलं आव्हान मानलं जात असून पोलीस त्याच्यापर्यंत कधी पोहोचतात? हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
दरम्यान, अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकरांच्या घरावर गोळीबार प्रकरणी पनवेलकरांनी किसन कथोरेंवर गंभीर आरोप केलेत..चिंचवली इथल्या खदानीच्या वादातून हा प्रकार घडला असून गोळीबारामागे बदलापूरच्या आमदारांचा हात असल्याचा आरोप पनवेलकरांनी केलाय..मात्र आमदार किसन कथोरेंनी आरोप खोडून काढलेत... मी असले उपदव्याप करत नाही, असं कथोरेंनी म्हंटलंय...