Amit Thackeray on ABVP: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी एबीव्हीपी संघटनेला जाहीर इशारा दिला आहे. पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शाखा सुरू करण्यात आली आहे. पण या कार्यक्रमाच्या ठिकाणी आखिल भारतीय विद्यार्थी सेना अर्थात एबीव्हीपीने पोस्टर लावल्याने दोन्ही संघटनांमध्ये वाद उफाळला. यानंतर आज अमित ठाकरेंनी आज पुण्यात आयुक्तांची भेट घेतली आणि एबीव्हीपीला धमकीच दिली. तुम्ही बोट लावलं, तर आम्ही हात घालणार. ॲक्शनला रिअॅक्शन मिळणारच असा इशारा अमित ठाकरेंनी दिला आहे.
"काल जो राडा झाला त्यानंतर मी आज आयुक्तांना भेटायला आला होतो. हे दुसऱ्यांदा झालं आहे. ते जरी सत्तेत असले तरी कितीही प्रेशर टाकलं तरी काही फरक पडणार नाही. मी माझ्या मुलांसोबत आहे. तुम्ही बोट घातलं, तर आम्ही हात घालणार. ॲक्शनला रिअॅक्शन मिळणारच," असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.
कायदा सुव्यवस्था मला बिघडवायची नाही. एवढंच मी सांगतोय की कायदा हा सगळ्यांना समान असला पाहिजे. दुसऱ्यांच्या मधे येण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. काल एका ऑफिसला टाळे ठोकलं आहे. जे पोस्टर लावलेलं आहे त्यासंदर्भात मी पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. सीसीटीव्हीमध्ये जर त्यांची मुलं असतील तर त्यांचे सर्व ऑफिसेस बंद करावे लागतील. यापुढे जर आम्ही पोस्टर लावले आणि बॉयकॉट लिहिल तर चालेल का?," अशी विचारणा त्यांनी केली आहे. "ती मुलं कोण आहेत ते बघू. यापुढे आमची अशीच रिएक्शन मिळणार," असंही त्यांनी म्हटलं,
"पुण्याची भीषण परिस्थिती झाली आहे. ड्रग्ज, महिलांवर अत्याचार, लहान मुलांना दारु, पोर्शे अपघातात दोन मुलांनं उडवलं त्याचं पुढे काय झालं? पुण्यात भीषण परिस्थिती आहे यावर फक्त पोलीस आयुक्त काम करू शकतात हे आज मी सांगून आलेलो आहे. 18 वर्षाखालील मुलांना ट्रक्स दारू देत असाल हे भीषण आहे . याची आम्ही लिस्ट तयार करणार आहोत. ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल केला आहे. छोटा गुन्हा आहे. गुन्हे अंगावर घ्यायची आम्हाला सवय आहे," असंही त्यांनी सांगितलं.
FAQ
1) हा गोंधळ कशाबाबत आहे?
पुण्यातील नोरोसजी वाडिया कॉलेजजवळील भिंतींवर एमएनव्हीएस (महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना), एनएसयुआय आणि एएसए या संघटनांचा बहिष्कार करण्याची मागणी करणारे पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टर्समध्ये "वाडिया आता एबीव्हीपीच्या (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) अधिपत्याखाली येईल" असे म्हटले होते. यावरून एमएनव्हीएस आणि एबीव्हीपी यांच्यात वाद सुरू झाला.
2) वादाची सुरुवात कशी झाली?
सोमवारी (१३ ऑक्टोबर २०२५) दुपारी नोरोसजी वाडिया कॉलेजजवळील पोस्टर्समुळे वाद सुरू झाला. एबीव्हीपीने या पोस्टर्ससाठी जबाबदारी नाकारली असून, ते अज्ञात व्यक्तींनी लावले असल्याचे सांगितले. यानंतर एमएनव्हीएस कार्यकर्त्यांनी प्रतिकार म्हणून एबीव्हीपीच्या कार्यालयावर हल्ला केला.
3) MNS कार्यकर्त्यांनी काय केले?
सदाशिव पेठेतील एबीव्हीपी कार्यालयात दुपारी ३:३० च्या सुमारास सुमारे ३५ एमएनव्हीएस कार्यकर्ते घुसले. त्यांनी कार्यालयातील संजीवनी कासबे आणि सारथक वेलापुरे या दोन एबीव्हीपी सदस्यांना शिवीगाळ केली, मारहाण केली, कार्यालयाची तोडफोड केली, एमएनएसचे पोस्टर लावले आणि बाहेरून कुलूप लावून कार्यालय बंद केले. यात कोणतीही गंभीर जखम झाली नाही.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.