)
Maratha VS OBC : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा प्रश्न पेटलाय. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्या, या जरांगेंच्या मागणीनंतर ओबीसींनी आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही समाजातल्या नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले. मात्र हाके आणि सदावर्तें यांच्या गाडीवर हल्ले झाले. आता वाघमारेंची गाडी अज्ञातांनी जाळलीय. त्यामुळे पुन्हा मराठा आणि ओबीसी वाद चिघळेल, अशी भीती व्यक्त केली जातेय.
जालन्यातल्या नीलम नगरमध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची (Navnath Waghmare) स्कॉर्पिओ कार अज्ञाताने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. कार जाळणारा कुंपणावरुन उडी मारुन आला. त्यानं कारवर ज्वलनशील पदार्थ टाकला. त्यानंतर कारला आग लावली. पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीच्या दृश्यातून गुन्हेगाराचा शोध सुरू केलाय.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्यात कलगीतुरा रंगलाय. याच पार्श्वभूमीवर, वाघमारेंनी जरांगेंवर आरोप केलाय. कार जाळण्याचा जरांगे समर्थकांचा कट होता, आमच्या कार्यकर्त्यांनी जरांगेच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका, असा इशाराही त्यांनी दिलाय. इतकंच नाही तर जरांगेसह शरद पवार, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केलीय.
वाघमारेंची गाडी जाळल्यानंतर नाना पटोलेंनी सरकारवर तोफ डागलीय. सुपारीबाज सरकारमुळे समाजात तेढ निर्माण झाली, अशी टीका त्यांनी केलीय. दरम्यान वाघमारेंच्या आरोपावर जरांगेंनीही प्रतिक्रिया दिली. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाकेंच्या गाडीवरही हल्ला झाला होता. तेव्हा त्यांनीही मराठा आंदोलकावरच आरोप केला होता. आता वाघमारेंच्या गाडीवरही हल्ला जरांगेंच्या कार्यकर्त्यांनीच केलाय, असा आरोप होतोय. वाघमारेंच्या इशा-यामुळे येत्या काळात जरांगे वाघमारे संघर्ष आणखी तीव्र होईल.
नवनाथ वाघमारेंच्या गाडीवर हल्ला कधी आणि कुठे झाला?
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची स्कॉर्पिओ कार जालन्याच्या नीलम नगरमध्ये अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोराने कुंपणावरून उडी मारून कारवर ज्वलनशील पदार्थ टाकला आणि आग लावली. ही घटना गेल्या काही दिवसांपूर्वी घडली असून, पोलिस सीसीटीव्ही फुटेजवरून तपास करत आहेत.
वाघमारेंनी कोणावर आरोप केले आहेत?
वाघमारेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर कार जाळण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, जर आमच्या कार्यकर्त्यांनी जरांगेंच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटू नका. तसेच, शरद पवार, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मनोज जरांगेंनी वाघमारेंच्या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली?
जरांगेंनी वाघमारेंच्या आरोपांना स्पष्ट नाकारले असून, हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मराठा आंदोलक शांततेने लढत आहेत आणि अशा हिंसक कृत्यांशी त्यांचा काहीही संबंध नाही. यामुळे दोन्ही नेत्यांमधील कलगीतूरा अधिक तीव्र झाला आहे.