Mumbai News : मुंबईच्या कांदिवलीमधील याच सावली बारवरुन सध्या राज्याचं राजकारण तापलंय.. विधानपरिषदेत सावली बारबाबत आरोप करुन शिवसेना UBTचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांना घेरलं. परबांच्या या आरोपांवर संतापलेल्या मंत्री योगेश कदम यांनी थेट हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिला. यावर आईच्या नावाने डान्सबार सुरु करुन पोरी नाचवायला लाज वाटत नाही का असा सवाल अनिल परबांनी केला.
तसंच आपण केलेले आरोप RTIच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे केल्याचा सांगत अनिल परब यांनीही कदम पिता-पुत्रांवर जोरदार निशाणा साधलाय.. मुख्यमंत्र्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही परबांनी केली. सावली बार प्रकरणासोबतच जगबुडी नदीतील वाळूचा विषयही अनिल परबांनी समोर आणलाय.
अनिल परबांच्या या आरोपांना रामदास कदमांनीही जशास तसं उत्तर दिलंय. आम्ही डान्सबार चालवणारे नसून फोडणारे आहोत अशा शब्दांत कदमांनी उत्तर दिलं. कदमांनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलंय.
सध्या महायुती सरकारमधील मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात सापडलेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येतेय. आता सावली बार आणि जगबुडी वाळू प्रकरणामुळे या यादीत गृहराज्यमंत्री योगेश कदमांची भर पडलीय.. त्यामुळे आता योगेश कदमांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
RCB
(20 ov) 201/8
|
VS |
RR
202/4(18 ov)
|
| Rajasthan Royals beat Royal Challengers Bengaluru by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(50 ov) 218/9
|
VS |
NAM
223/9(49.3 ov)
|
| Namibia beat Oman by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
KKR
(20 ov) 181/4
|
VS |
LSG
182/7(20 ov)
|
| Lucknow Super Giants beat Kolkata Knight Riders by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.