Sick Leave चा पगार मंजूर करण्यासाठी लाच मागितली; शिक्षकाने अधिकाऱ्याला असा धडा शिकवला की आयुष्यभर लक्षात राहिल
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत केंद्र प्रमुख एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. वैद्यकीय रजेचे देयक काढण्यासाठी त्याने एका शिक्षकाकडे 9 हजाराची लाच मागितली होती.
प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : Sick Leave चा पगार मंजूर करण्यासाठी लाच मागण्याऱ्या अधिकाऱ्याला शिक्षकाने आयुष्यभर लक्षात राहिल असा धडा शिकवला आहे. शिक्षकाकडून 10 हजार रूपयांची लाच मागणारा केंद्र प्रमुख जाळ्यात अडकला आहे (demanded bribe from a teacher). गोंदिया (Gondia) मधील तिरोडा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत केंद्र प्रमुख एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. वैद्यकीय रजेचे देयक काढण्यासाठी त्याने एका शिक्षकाकडे 9 हजाराची लाच मागितली होती. जिल्हा परिषद शाळा गांगला येथेच सापळा रचून या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. धनपाल श्रीराम पटले (47) रा. नेहरु वार्ड तिरोडा असे लाचखोर केंद्रप्रमुख आरोपीचे नाव आहे.
तक्रारकर्ता भंडारा येथील असून गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण विभागात शिक्षक पदावर कार्यरत आहे. तक्रारकर्ता शिक्षक डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान वैद्यकीय रजेवर होता. वैद्यकीय रजेनंतर जानेवारीमध्ये तो कर्तव्यावर हजर झाला. मात्र, वैद्यकीय रजा कालावधीचा वेतन काढण्यात आला नाही. यासाठी तक्रारकर्ता शिक्षकाने रितसर गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज केला.
वेतन काढण्यास सातत्याने टाळाटाळ होत असल्यामुळे शिक्षकाने गटशिक्षणाधिकारी कार्यालयात साधला. दरम्यान गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत विषय शिक्षक तथा केंद्र प्रमुख धनपाल श्रीराम पटले यांच्याशी त्यांनी संपर्क केले असता वैद्यकीय रजेचे वेतन काढण्यासाठी केंद्र प्रमुखाने 10 हजार रुपयाची लाचेची मागणी केली.
तक्रारकर्ता शिक्षकाला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्यामुळे गोंदिया लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली. तक्रारीची सहनिशा करण्यात आली. तसेच लाच देण्याची ठरविण्यात आले. त्यानुरूप तिरोडा तालुक्यातील गांगला येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत पंचासमक्ष आरोपी केंद्र प्रमुख धनपाल श्रीराम पटले याला 9 हजार रुपयाची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी तिरोडा पोलिस ठाण्यात आरोपी धनपाल श्रीराम पटले विरुद्ध लाचलुचपत कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करत अटक करण्यात आली आहे.