Hingoli News : हिंगोलीत मुर्दाड आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार उघड झालाय. आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर भरवलं होतं. तेव्हा 43 महिलांची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया झाली. मात्र शस्त्रक्रियेनंतर या 43 महिलांना इतक्या थंडीत चक्क थंडगार जमिनीवर फक्त गादी टाकून त्यावर झोपवण्यात आलं. जर प्रशासनाकडून असं शिबिर भरवलं जात असेल तर किती महिला येतील, त्यांच्या शस्त्रक्रियेनंतर बेड्सची सोय केलीय का हे बघण्याचं काम प्रशासनाचं नव्हतं का? असा सवाल विचारला जातोय. या बातमीनंतर सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान झी 24 तासनं ही बातमी दाखवल्यानं आरोग्य प्रशासन हादरलं. जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीनं 20 बेड्स आखाडा बाळापूरला पाठवले.. इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही बातमीची दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिलेत.  
महिलांसाठी अनेक योजना राबवताना त्याच महिलांना किमान आरोग्य सेवा आणि योग्य सुविधा मिळवण्याचा अधिकार नाही का.. आता किमान झी 24 तासच्या बातमीनंतर तरी सरकार तातडीनं आरोग्य खात्याला मंत्री देऊन आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी कामाला लागेल अशी अपेक्षा करुया. 


हिंगोलीतील घटनेनंतर विरोधक आक्रमक झालेत.  या राज्याला आरोग्य खातं नाही. अगोदरचे आरोग्य मंत्री भ्रष्टाचारी होते, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. तर सरकार येऊन 1 महिना उलटला तरीही सरकार स्थापन होत नाही. या राज्यात आरोग्य विभाग अस्तित्वात आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय. 


हिंगोलीतील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतलीय. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवल्याचा प्रकार बाळापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात घडला होता. झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासानानं रुग्णालयात 20 बेड पाठवले. आता थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत. महिलांना तात्काळ सुविधा उपलब्ध करून द्या, असेही आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिलेत.


या राज्याला आरोग्य खातं नाही. अगोदरचे आरोग्य मंत्री भ्रष्टाचारी होते, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. तर सरकार येऊन 1 महिना उलटला तरीही सरकार स्थापन होत नाही. या राज्यात आरोग्य विभाग अस्तित्वात आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय.