Maharashtra Assembly Election 2024: भाजप खासदार अशोक चव्हाण यांची  मुलगी श्रीजया चव्हाण या भोकर  विधानसभेतून विजयी झाल्यात. विजयानंतर  अशोक चव्हाण यांनी मुलीसह भोकर मतदारसंघात मतदारांचे आभार मानले. या आभार दौ-यातील चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांवर बोचरी टीका केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच अशोक चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांवर बोचरी टीका केलीय. मला त्रास दिलेले सर्व पडले. लातूरमध्ये एक पडला तर दुसरा कसा तरी जिंकला, अशा शब्दांत त्यांनी देशमुख बंधूंवर टीका केली. तर पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात सगळे साफ झाले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले थोडक्यात जिंकले, असा निशाणा चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांवर साधलाय. 


अशोक चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली असली तरीही अशोक चव्हाण हे संयमी आहेत. बदला घेण्याची भूमिका त्यांची नसते, अशी कौतुकपर प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.  दरम्यान बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर अशोक चव्हाणांनी जहरी प्रतिक्रिया केली. त्यावरुन चव्हाणांना सुनावताना, खुनशी पद्धतीचा विचार कुणी करु नये असं सत्यजित तांबे म्हणाले. 


काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नांदेडमधील विधानसभेच्या नऊ पैकी नऊ जागा निवडून आणल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये आल्यानंतरही करून दाखवली. त्यामुळे नांदेड म्हणजे अशोक चव्हाण आणि अशोक चव्हाण म्हणजेच भाजप असं नवीन समीकरण तयार झालंय.