Exclusive: अशोक खरात सर्पदेवता जमिनीवर आणण्याचा करायचा दावा, मोटर ऑपरेटेड साप दाखवून गंडा

Ashok Kharat:   कॅप्टन अशोक थोरातच्या लैंगिक शोषणाच्या कथा अंगावर शहारे आणणा-या आहेत. सिद्ध पूजेच्या नावाखाली अशोक खरात भाविकांची फसवणूक कशाप्रकारे करायचा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

प्रविण दाभोळकर | Updated: Mar 20, 2026, 09:10 PM IST
Exclusive: अशोक खरात सर्पदेवता जमिनीवर आणण्याचा करायचा दावा, मोटर ऑपरेटेड साप दाखवून गंडा
अशोक खरात

Ashok Kharat: महाराष्ट्रात सध्या बोगस बाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांची चर्चा सुरु आहे. दिवसागणिक अशोक खरातचे अनेक कारनामे समोर येत आहेत. कथित ज्योतिष कॅप्टन अशोक खरात याच्या लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती आता आणखी वाढताना दिसतेय. त्यामुळं सध्या असलेल्या एक तक्रारदारापेक्षा अनेक तक्रारदार समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस दलातील अतिशय विश्वासू सूत्रांच्या माहितीनुसार व्हिडिओंची संख्या खूप मोठी असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं या प्रकरणात आणखी काही तक्रारदार पोलिसांकडं धाव घेण्याची शक्यता आहे.  कॅप्टन अशोक थोरातच्या लैंगिक शोषणाच्या कथा अंगावर शहारे आणणा-या आहेत. सिद्ध पूजेच्या नावाखाली अशोक खरात भाविकांची फसवणूक कशाप्रकारे करायचा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

सिद्ध पूजेच्या नावाखाली भाविकांची फसवणूक

अशोक खरात सिद्ध पूजेच्या नावाखाली भाविकांची फसवणूक करायचा. सर्पदेवता जमिनीवर आणण्याचा दावा अशोक खरात करायचा. सर्पदेवतेशी संवाद साधतोय असे सांगून लाखो रुपये त्याने उकळले. मोटर ऑपरेटेड साप दाखवून गंडा घालायचा.  ईशान्येश्वर मंदिरात सर्पसंवाद पूजा व्हायची.

Exclusive: अशोक खरात 'कस्तुरी' लावून करायचा महिलांचं शोषण; काय आहे त्या रसायनात? 

'सर्पदेवता स्वर्गातून जमिनीवर आणू'

आपण सिद्ध पूजा करतो असे सांगून तो लोकांची फसवणूक करत असे. आपण सर्पदेवता स्वर्गातून जमिनीवर आणू, असे तो सांगायचा. ईशानेश्वर मंदिरात तुम्हाला सिद्धपूजा करावी लागेल यासाठी लाखो कोटी रुपये घ्यायचा. 

काळोखात मोटार ऑपरेटेड साप

मी देवाला जमिनीवर आणू शकतो, असा दावा अशोक खरात करायचा. स्वर्गातून खुद्द सर्पदेवता येईल आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरे होकारार्थी किंवा नकारार्थी देईल, असे तो सांगायचा. पण तो प्रत्यक्षात हा साप नसून ड्रोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या मोटर्सचा वापर करायचा. पण बाबा अशी वातावरणनिर्मिती करायचा की भाविकांना तो साप प्रत्यक्षात आलाय असे भासायचे. तिथल्या अंधारात लोकांना कळायचे नाही. साक्षात सर्पदेवता आलीय आणि आपल्यावर प्रसन्न झालीय, असे भाविकांना वाटायचे. 

Ashok Kharat Case: 'मला कल्पना नाही', अशोक खरात प्रकरणी चाकणकरांची पहिली पोस्ट; पोलीस महासंचालकांना दिलं पत्र 

आता रिमोट ऑपरेटेड साप हादेखील तपासाचा विषय असणार आहे. विशेष म्हणजे बड्या हस्ती येथे यायची. यांची कामे व्हायची अशी श्रद्धा लोकांच्या मनात पसरायची. यातून आणखी भाविक अशोक खरातकडे आकर्षित व्हायचे, अशी माहिती समोर येतेय.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More