सागर गायकवाड, नाशिक (झी 24 तास ब्युरो): Ashok Kharat Fees Per Visit: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातसंदर्भात रोज नवीन खुलासे समोर येत असतानाच आता हा बाबा नाशिकबाहेरील ठिकाणी भक्तांसोबत जाण्यासाठी तब्बल पाच लाख रुपये फी म्हणून घेत असे अशी माहिती समोर आली आहे. भोंदू अशोक खरातकडे आलेले भक्त बाबाला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी, फार्महाउसवर घेऊन जाण्यासाठी इच्छुक असायचे अशी माहिती समोर आली आहे. अशा 'आउट डोअर व्हिजिट'साठी खरात तब्बल पाच लाखांपर्यंत रक्कम आकारत असल्याची चर्चा आहे.
नाशिकबाहेरील भक्तांकडे जाण्यासाठी भोंदू बाबा आलिशान महागड्या कारचा सर्वाधिक वापर करत असे. खरातचे नाशिकमधील कार्यालय, तसेच त्याच्या निवासस्थानाजवळील काही रहिवाशांशी चर्चा केली असता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमावास्या व पौर्णिमेस खरातला नेण्यासाठी पहाटेपासून महागड्या कारची लांब रांग लागत असे. मात्र, जो जास्त दाम देईल त्याच्याचकडे तो जात असे. या दोन दिवसातील दीड ते दोन तासाच्या भेटीसाठी खरात तब्बल पाच लाख रुपये, तसेच जाण्यासाठी जितके अंतर जास्त तितके दाम तो लाखो रुपयांनी वाढवत असे. एसआयटीनेदेखील तपासात हा खुलासा केला आहे. तसेच खरात भक्तांना विमान प्रवासासाठीदेखील आग्रह धरत असे.
भोंदू खरात महागड्या कारशिवाय भक्तांची इच्छा असेल तेथे जात नसे, असा धक्कादायक खुलासा एसआयटीकडे फसवणूक झालेल्या सहा ते सात लोकांनी केला आहे. पुण्यातील एकाच अशा करोडपती भक्ताकडून पूजा करण्यासाठी वाहन हवे असे सांगून 90 लाखांची महागडी कार खरातने खरेदी करायला लावली होती. नंतर हीच कार अशोक खरातने स्वतःच्या नावावर करून घेतली.
भोंदू खरातच्या कार्यालयात अमावास्या व पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजेपासून दरबार भरत असे. मात्र, एखाद्या भक्ताला भोंदूला बाहेर कुठे न्यायचे असेल तर त्या दिवशी दरबार रात्री उशिरापर्यंत चालत असे, त्यामुळे आमच्या कॉलनीत सकाळपासून महागड्या कारची रांग लागे.
भोंदू बाबा अशोक खरात यांच्या शिवानिका संस्थांचे बँक अकाऊंट सील करण्यात आलं आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू असून विशेष तपास पथकाकडून मालमत्तेची माहिती मागवण्यात आली आहे. कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी केली जात आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास आता यंत्राणांच्या माध्यमातून केला जातोय. बेनामी मालमत्ता असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुढील 2–3 दिवसांत तपासाला वेग येणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NAM
(49 ov) 198
|
VS |
SCO
199/3(38 ov)
|
| Scotland beat Namibia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.