Ashok Kharat Snake Puja : महिलांवर अत्याचार करणारा कॅप्टन अशोक खरातच्या अंगावर शहारे आणणा-या कहाण्या आपण पाहिल्या ऐकल्या असतील. पण खरात अनेक उद्योजकांची आर्थिक लूटही करत होता. अनेक उद्योगपती, व्यापा-यांची त्यानं आर्थिक लूट केली. काही उद्योजकांना त्यानं आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्तही केलं होतं. असाच एक आर्थिकदृष्ट्या नाडलेला पीडित झी 24 तास आलाय. या उद्योगपतीनं झी 24 तासवर त्याची कहाणी सांगितलीय.
१० वर्षांपूर्वी अडचणीत असताना माझा एक मित्र मला त्यांच्याकडे घेऊन गेला. तेव्हा अशोक खरातने सांगितलं तुम्ही खूप अडचणीत आहात. मी पूजा करेल तर तुम्ही त्या अडचणीतून बाहेर पडला. खरातने पहिलं सांगितलं की मी वर्षातून एकच पूजा करतो. ती पूजा म्हणजे साक्षात आकाशातून देव येतो. देवाच्या रुपात नाग येतात. नागाची पूजा केली त्यातून तुम्हाला खूप मोठी प्रगती मिळेल आणि तुमचं जे व्यवसायात जे नुकसान भरुन निघेल. त्यासोबत तुमच्याकडे करोडेंची संपत्ती येईल. व्यवसायात मोठा फायदा मिळेल. अशोक खरातच्या या आश्वासनाने मी खूप आनंदी झालो. त्यानंतर मी त्यांना ही पूजा करण्यासाठी सांगितलं. अशोक खरातने सांगितलं की, या पूजेसाठी मला कमीत कमी २ ते ३ कोटी रुपये लागतात.
त्यांनी एका संध्याकाळी मला त्यांच्या गावी बोलवलं आणि ईशान्येश्वरा मंदिर आहे महादेवाचं इथे मागे घेऊन गेले. तिथे त्यांनी पूजा चालू केली. पूजा चालू करण्यापूर्वी माझे डोळे बंद केले. डोळे बंद करुन मला मंत्र म्हणायला सांगितला. त्यानंतर १० मिनिटांनी मला म्हणाले साक्षात नाग आले डोळे उघडा. मी डोळे उघडल्यावर साप दिसत होता. मला हे दृश्य पाहून मला विश्वास बसला की साक्षात खरंच साप आला आहे. सापाची ही पूजा १५ ते २० मिनिटं सुरु होती. त्यानंतर मला म्हणाले तुमचे प्रश्न विचारा मग नागराज मला उत्तर देतील. मग मी माझ्या व्यवसायातील अडचणी विचारल्यात. मी कसा व्यवसायात मोठा होईल, मी कुठे जायचं, मी सगळं सांगितलं आणि खरातने त्याची उत्तर दिली. तुम्ही या पूजेचे दान द्या तुम्ही जेवढे पैसे देणार त्याचे एक ते दोन वर्षात त्याच्या कितीतरी पटीने पैसे परत मिळतील.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
RR
(11 ov) 150/3
|
VS |
MI
123/9(11 ov)
|
| Rajasthan Royals beat Mumbai Indians by 27 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.