)
Bachchu Kadu : प्रहार संघटनचे प्रमुख आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये मंगळवारी 28 ऑक्टोबरला शेतकऱ्यांचा 'महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा' धडकला आहे. या मोर्चामुळे बुधवारी शहराकडे येणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नागपूर खंडपीठाने बुधवारी महामार्ग 6 वाजेपर्यंत मोकळा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हा मोर्चा पोलीस स्टेशनकडे वळला. सरकारचे शिष्टमंडळ गृहराज्यमंत्री पंकज भोयरआणि अर्थराज्यमंत्री आशीष जयस्वाल यांना आंदोलकांशी चर्चा केली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेसाठी बच्च कडू मुंबईत आले आहेत. यावेळी मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बच्चू कडू माध्यमांशी बोलताना म्हणाले की, हे आंदोलन श्रेयवादाचं नसून शेतकरी आणि मंजुरांसाठी आहे. हे आंदोलन राजकारण नाही, खरं तर शेतकऱ्यांच्या ज्या काही वेदना आहेत, त्याची ही लढाई आहे. हे आंदोनल मुख्यमंत्री समजून घेतली एवढीच अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, कर्जमाफीची मागणी आणि सरकारची भूमिका यावर राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी माध्यमांवरही निशाणा साधला. 'तुम्ही लोकं एखादी गोष्ट त्याला कशी लावायची भांडणं लावतं तुम्ही तो नारद, तशी तुमची मीडियाची भूमिका आहे', असे म्हणत त्यांनी मीडियाला खडेबोल सुनावले. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. कर्जमुक्ती केली नाही, तर शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून बँकेचे पैसे भरावे लागतील, यावर त्यांनी भर दिला. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी करत होते, पण आता सत्तेत आल्यावर तसा नियमच नाही, असे सांगत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. या मुद्द्यावर राजकारण करण्याची इच्छा नसून, सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा आणि त्याचे संपूर्ण श्रेय घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बच्चू कडू म्हणाले की, जर आंदोलनाबद्दल गांधीगिरीनं तोडगा निघाला नाही तर भगतसिंग बनू असा थेट इशारा बच्च कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे. सरकारसोबतच्या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवू, असं बच्च कडू यांनी स्पष्ट केलं आहे. तर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
संध्याकाळी सात वाजता मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस आणि शेतकरी नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, महसूलमंत्री व इतर महत्त्वाचे मंत्री आणि अधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. चाळीसहून अधिक महत्त्वाच्या व्यक्ती बैठकीत हजर राहणार आहेत. बच्चू कडू यांनी दिलेले निवेदन आणि 7 एप्रिलला बच्चू कडुंसोबतच्या बैठकीत केलेल्या निर्णयावरील कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीत बच्चू कडू यांच्या आंदोलनावर तोडगा निघणार का हे पाहावं लागेल.