Akshay Shinde Death: बदलापूर चकमक प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद असल्याचा अहवाल समोर आला आहे. याप्रकरणी 5 पोलीस अधिकार्यांविरुद्ध फौजदारी खटला चालणार आहे. मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला आहे.
पोलीस एन्काऊंटरमध्ये आरोपी अक्षय शिंदेंचा मृत्यू झाला होता, अशी माहिती गृह विभागाने दिली होती. अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि बचावासाठी पोलिसांना गोळी चालवावी लागली असे सांगण्यात येत होते. दरम्यान बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत, असे फॉरेन्सिक अहवालात म्हटले आहे.
अक्षयवर गोळीबार केलेला अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याची टिपण्णी अहवालात करण्यात आली आहे. अक्षयच्या मृत्युला 5 पोलिस अधिकारी जबाबदार आहेत. कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे. हा अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आला.
पीआय संजय शिंदे, उपनिरीक्षक निलेश मोरे, हरीश तावडे आणि अभिजित मोरे अशी यातील पोलिसांची नावे आहेत. मृत व्यक्तीशी झालेल्या झटपटीत पाच पोलिसांकडून वापरलेले बळ अनावश्यक होते आणि मृताच्या मृत्यूसाठी हे पाच पोलीस जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. दोन आठवड्यांनी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. जे प्रश्न या आधी न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले तेच प्रश्न आज सादर झालेल्या अहवालात उपस्थित केले गेले आहेत. बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत असे फॉरेन्सिक अहवालात म्हटले आहे.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
CRO
(20 ov) 90/7
|
VS |
ESP
93/2(11.1 ov)
|
| Spain beat Croatia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ESP
(20 ov) 290/3
|
VS |
CRO
75/8(20 ov)
|
| Spain beat Croatia by 215 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CRO
(18.2 ov) 55
|
VS |
ESP
58/1(4.4 ov)
|
| Spain beat Croatia by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.