Ovary Trafficking Racket : देशात दर दिवशी काही नव्या आणि हादरवणाऱ्या प्रकरणांचा खुलासा होत असताना बदलापूरमधून एका खळबळजनक प्रकरणाचा खुलासा झाला. जिथं गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार नुकताच समोर आला आहे. याबाबत माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्या रॅकेटला आणखी किती महिला बळी पडल्या आहेत याचा पोलिसांनी कसून शोध सुरू केला आणि धक्कादायक माहिती समोर आली.
अंडाशयाची तस्करी होणाऱ्या या प्रकरणात डॉक्टरांसह सुलक्षणा गाडेकर मुख्य आरोपी आयव्हीएफ सेंटरचाही सहभाग असल्यामुळं पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू करत या जाळ्यात किती महिलांची फसवणूक करण्यात आली आहे या रोखानं चौकशी केली. ज्यामुळं या प्रकरणाची पाळंमुळं देशभरात पसरली असल्याचं सांगण्यात येत आहे.
स्त्री बीज तस्करी प्रकरणात काही डॉक्टर आणि इतर काही एजंटसह आयव्हीएफ सेंटरसुद्धा अडकण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ज्या आयव्हीएफ सेंटरची गरज भासत होती, त्या सेंटरचा शोध घेतला जात आहे असून नेमकं किती महिलांना तस्करी प्रकरणात गुंतवून त्यांची फसवणूक करून स्त्री बीज काढण्यात आलं आहेत, याचा पोलीस तपास करत आहेत.
गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवत स्त्री बीज काढून त्यांची देशभर विक्री होत असल्याचा संशय पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर व्यक्त केला आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळात या स्त्री बीजांची त्याची तस्करी केली जात असल्याचा संशयावरून तपास पुढे जात असतानाच महिलांना या प्रकरणी 15 ते 20 हजार रुपये देऊन त्यांच्या शरीरातील स्त्री बीज डॉक्टरांकडून काढून आयव्हीएफ सेंटरच्या माध्यमातून त्याची विक्री केली जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, इथं या तस्करी प्रकरणाची चर्चा सुरू असचानाच भंडाऱ्यात बाळ विक्रीचं आणखी एक प्रकरण समोर आल्यानं पुन्हा खळबळ माजली आहे. गोंदियातील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी डिसेंबर 2025 मध्ये भंडाऱ्याच्या मोहदुरा येथील दाम्पत्याला सुमारे 4 लाख 70 हजार रुपयांत नवजात बाळ विकल्याची माहिती आहे. वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहगाव (देवी) येथून महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने बाळ ताब्यात घेतले. यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी गोंदिया येथील नवजात बाळ विक्री प्रकरणातही त्यांचे नाव समोर आले होते. त्या प्रकरणात दोन दिवसां आधी आरोपी डॉक्टरला पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. आज पुन्हा तसाच बाळ विक्री प्रकरण पुढे आल्याने या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
PAK
(20 ov) 212/8
|
VS |
SL
207/6(20 ov)
|
| Pakistan beat Sri Lanka by 5 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
(20 ov) 159/7
|
VS |
ENG
161/6(19.3 ov)
|
| England beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 256/4
|
VS |
ZIM
184/6(20 ov)
|
| India beat Zimbabwe by 72 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.