Bank Job: बॅंक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज!

Bank Of Baroda Job: बॅंक ऑफ बडोदा अंतर्गत एकूण 592 रिक्त पदे भरली जातील.

Pravin Dabholkar | Updated: Nov 29, 2024, 06:08 PM IST
Bank Job: बॅंक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज!  title=
बॅंक ऑफ बडोदा

Bank Of Baroda Job: बॅंक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असलेले अनेकजण बॅंकेत नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. बॅंक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

पदभरतीचा तपशील

बॅंक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, असिस्टंट वाइस प्रेसिडंट, रिलेशनशिप मॅनेजर, प्रोडक्ट हेडसह इतर पदे भरली जाणार आहेत. यासाठी तुम्हाला आजच अर्ज करावा लागणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएट/बीई/बीटेक/पीजीडीएम/सीए/एमबीए शिक्षण पूर्ण केलेल असणे आवश्यक आहे. पदानुसार लागणाऱ्या शैक्षणिक अर्हतेचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. बॅंक ऑफ बडोदा अंतर्गत एकूण 592 रिक्त पदे भरली जातील. यामध्ये 139 पदे डिजिटल ग्रुपसाठी आणि 202 पदे रिसीवेबल्स मॅनेजमेंटसाठी आहेत. याअंतर्गत फायनान्सचे 1 पद, एमएसएमई बॅंकींची 140 पदे, डिजिटल ग्रुपची 139 पदे, अकाऊंट्स रिसिवेबल्स मॅनेजमेंटची 202 पदे, आयटीची 31 पदे आणि कॉर्पोरेट अॅण्ड इंस्टिट्यूशनल लोनची 79 पदे भरली जाणार आहेत. 

अर्ज शुल्क

खुला वर्ग, ईड्ब्लूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकडून 600 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. एससी, एसटी पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांकडून 100 रुपये शुल्क घेतले जाईल. 

निवड प्रक्रिया 

बॅंक ऑफ बडोदा भरती 2024 निवड प्रक्रिये अंतर्गत उमेदवारांची निवड क्रेडेंशियल आणि प्रोफेशनल बॅग्राऊंडच्या आधारे होईल. उमेदवारांना नोटिफिकेशनमध्ये दिलेली पात्रता पूर्ण केली तर त्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. 

असा करा अर्ज 

बॅंक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबासाइट bankofbaroda.in वर जा. होमपेजवरील करिअर सेक्शनमध्ये जा. यात करंट भरती सेक्शनवर क्लिक करा. यानंतर भरती संदर्भातील लिंकवर क्लिक करा. ज्या पदावर अर्ज करायचाय त्यावर क्लिक करा. आता मागण्यात आलेली सर्व माहिती भरा आणि नोंदणी पूर्ण करा. यानंतर इतर तपशील भरुन अर्ज जमा करा. 

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. यानंतरच अर्ज करावा. या भरतीची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर होती. पण आता ही मुदत वाढवून 30 ऑक्टोबर करण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जाची शेवटची तारीख वाढवल्याचे नोटिफिकेशन 

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

एसबीआयमध्ये नोकरी आणि 85 हजारपर्यंत पगार

एसबीआयमध्ये जीएम, डेप्युटी इन्फ्रा सिक्योरीटी आणि स्पेशल प्रोजेक्टस (CISO), इंसिडेंट रिस्पॉन्स आणि असिस्टंट मॅनेजरची पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. एसबीआय भरती अंतर्गत एकूण 171 पदे भरली जाणार आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सिक्युरिटी अँड स्पेशल प्रोजेक्ट्स) चे 1 पद,DGM (घटना प्रतिसाद) चे 1 पद, सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता-सिव्हिल) ची 42 पदे, असिस्टंट मॅनेजर(इंजिनियर-इलेक्ट्रिकल) ची 25 पदे, असिस्टंट मॅनेजर (इंजिनियर-फायर)ची 101 पदे आणि सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता-सिव्हिल) (अनुशेष) चे 1 पद भरले जाणार आहे.