मुंबईत मनसे - भाजपात बॅनरवॉर! मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं

 मनसे आणि भाजपमध्ये बॅनरवॉर सुरु झालंय. परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असा उल्लेख असलेला बॅनर लावत भाजपनं मनसेसह ठाकरे बंधूंना डिवचलंय. 

पूजा पवार | Updated: Nov 15, 2025, 09:37 PM IST
मुंबईत मनसे - भाजपात बॅनरवॉर! मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं
(Photo Credit : Social Media)

Mumbai News : बिहार निवडणुकांच्या निकालानंतर आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय वातावरण तापलंय. मनसे आणि भाजपमध्ये बॅनरवॉर सुरु झालंय. परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असा उल्लेख असलेला बॅनर लावत भाजपनं मनसेसह ठाकरे बंधूंना डिवचलंय. 

Add Zee News as a Preferred Source

बिहार निवडणुकांनंतर राज्यातलं  राजकारण चांगलंच तापलंय. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झालीये. मुंबईत तर मनसे आणि भाजपचं बॅनरवॉर सुरु झालंय. मुंबईमध्ये कुणाची सत्ता येणार? यावरून दावे-प्रतिदावे केले जातायत. काही दिवसांपूर्वीच मुंबईत शिवसेनाभवनासमोर ठाकरे बंधूंचा फोटो असलेलं बॅनर लावण्यात आलं होतं. त्यावर ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असा आशय लिहिण्यात आला होता. राज ठाकरेंच्या आदेशानंतर ते बॅनर हटवण्यात आले होते. मात्र आता याच बॅनरला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. परिवाराचा नाही. मुंबईचा सेवक तोच नगरसेवक आशयाचे बॅनर लावकर भाजपने ठाकरेंना डिवचलंय.

केवळ बॅनरयुद्ध सुरु झालं नाहीये तर शाब्दिक चकमकही यानंतर सुरु झालीये. आम्हाला परिवारशाही  मान्य नसून मुंबईकरांप्रती सेवा समर्पित करण्याची आमची भूमिका असल्याचं भाजपच्या प्रवीण दरेकरांनी म्हटलंय. तर भाजपचं मुंबई प्रेम म्हणजे पुतना मावशीचं प्रेम असल्याची टीका शिवसेना UBTच्या अंबादास दानवेंनी केलीये.

हेही वाचा : IPL 2026 मध्ये अशी असेल सर्व 10 फ्रेंचायझींची टीम; ऑक्शनसाठी कोणाच्या खिशात किती पैसे शिल्लक?

 

भाजपला शब्दांचे फवारे उडवायची सवय असल्याचा टोला माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी लगावलाय. तर आता ठाकरे बंधू म्हणजे पलटी ब्रँड असून आगामी निवडणुकांमध्ये मुंबईकरांचा ब्रँड चालणार असल्याचं भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलं. तर भाजपच्या परिवारवादाविरोधात बॅनरवरून काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी भाजपला टोला लगावलाय.

राज्यात लवकरच नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका होणार आहे. पालिका निवडणुकांची घोषणा होणं अद्याप बाही आहे.. तर त्याआधीच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते आपापसात भिडलेत. त्यामुळे येत्या काळात मुंबईत कुणाचे सर्वाधिक नगरसेवक असणार हे येणारा काळच सांगेल.

FAQ : 

सध्या मुंबईत बॅनर वॉर नेमकं कशावरून सुरू झालंय?
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर (NDA चा मोठा विजय) महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वातावरण तापलंय. मुंबईत भाजप आणि मनसे (ठाकरे बंधूंच्या शिवसेनेसह) यांच्यात बॅनर वॉर सुरू झालाय. भाजपने "परिवाराचा नाही... मुंबईचा सेवक तोच नगरसेवक" असा बॅनर लावून ठाकरे बंधूंना (उद्धव आणि राज) थेट डिवचलंय.

भाजपचा बॅनर नेमका काय म्हणतो?
"परिवाराचा नाही... मुंबईचा सेवक तोच नगरसेवक"
यात ठाकरे कुटुंबावर (परिवारशाही) निशाणा साधला आहे. भाजप म्हणतंय की आमचे नगरसेवक मुंबईकरांचे खरे सेवक आहेत, कुटुंबाचे नाही.

मनसेने काय बॅनर लावला होता?
काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर उद्धव-राज ठाकरे यांचा फोटो असलेलं बॅनर लावलं होतं – "ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक". राज ठाकरेंच्या सूचनेनंतर ते बॅनर हटवण्यात आलं होतं.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More