Sunetra Pawar meets Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या बारामती पोटनिवडणुकीसाठी तयारी करत आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून, पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा पवारांकडून बिनविरोध निवडून येण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र काँग्रेसने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे. यामुळे निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान भाजपाही निवडणुकीत सुनेत्रा पवारांना शक्य ती मदत करण्यास पुढाकार घेत आहे. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता त्यांनी सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांच्यासह सुनील तटकरे, पार्थ पवार, हसन मुश्रीफ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. तब्बल एक तास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. या भेटीत बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. उद्या बारामती पोटनिवणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याच्या अनुषंगाने ही भेट झाली.
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. "पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल," असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना दिला आहे.
काँग्रेसची उमेदवारी माघार न घेतल्यास प्रचारात न उतरण्याचा निर्णय काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. आज काँग्रेसचे काही नेते दिल्लीत हायकमांडशी संपर्क साधणार आहेत. बारामतीची उमेदवारी माग घेण्यावर काँग्रेस मधील एक गट अजूनही ठाम आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही काँग्रेसशी संपर्क सुरू असल्याची माहिती आहे.
प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. माझ्यासाठी बारामती हा भावनिक प्रश्न आहे. पवारांचे नाव मोठे आहे ते बारामतीकराच्या आशिर्वादाने आहे. अजितदादा हा मोठा भाऊ गमावला आह. त्यामुळे हा आमच्यासाठी मोठा विषय आहे. काय वेदना होत असतील याची आम्हाला जाणीव आहे. राजकीय पक्षाने काय निर्णय घ्यावा हा त्यांचा मुद्दा आहे, पवारसाहेब ज्यावेळी निवडणूकीला उभे राहिले तेव्हा आम्ही सगळ्यांशी बोललो आणि पवार साहेबांनी निवडणूक ही बिनविरोध झाली. आम्ही सन्मानाने बोललो त्यामुळे काँग्रेसने भूमिका घेतल असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
RR
(11 ov) 150/3
|
VS |
MI
123/9(11 ov)
|
| Rajasthan Royals beat Mumbai Indians by 27 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.