Baramati News: बारामती शहरातील आमराई परिसरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा बुधवारी 18 जून रोजी मध्यरात्रीच्या आसपासही सुरु होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुधवारी म्हणजेच काल रात्री 11 वाजता देखील ही बँक उघडी होती, आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून याचा संबंध माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीशी जोडला जात आहे. मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार लढत असलेल्या या निवडणुकीला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवण्यात आलं आहे.
बारामती शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या सुरू असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतदारांच्या याद्या देखील सापडल्याचा दावा 'सहकार बचाव पॅनल'कडून करण्यात आला आहे. रात्रीच्या अकरा वाजता नेमकी ही बँक का उघडी ठेवण्यात आली होती? असा सवाल 'सहकार बचाव पॅनल'चे कार्यकर्ते विचारत आहेत. या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप देखील केला जातोय. या ठिकाणी गोंधळ होणार याची कुजबूज सुरु झाल्यानंतर तातडीने रात्रीच पोलीस इथे दाखल झाले. रात्री उशीरा ही बँक सुरु का यासंदर्भात 'सहकार बचाव पॅनल'चे रंजन तावरे हे जाब विचारताना दिसले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरु असून या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 'निळकंठेश्वर पॅनल' आणि चंद्रराव तावरेंच्या 'सहकार बचाव पॅनल'मध्ये थेट लढत आहे. म्हणूनच ही बँक उघडी असल्याच्या मुद्द्यावरुन दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये रात्री बँकेतच पोलिसांसमोर बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं.
शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना तावरेंनी अजित पवारांवर टीका केली होती. शरद पवारांनी सांगितल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही मदत केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार राजकारणात आले. मात्र आता ते निवडणुकीच्या काळात सहकारी संस्थांचा गैरवापर करत आहेत. त्यांच्या घरात अनेक कारखान्यांचे आणि विविध प्रशासकीय कर्मचारी आहेत. त्यांचा ते गैरवापर करतात, असा आरोप तावरेंनी केला. त्यालाच वयाचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी जाहीर भाषणातून 16 जूनच्या जाहीर सभेच्या माध्यमातून उत्तर दिलं.
अजित पवारांनी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष तसेच भाजपा नेते चंद्रराव तावरेंच्या नावाचा थेट उल्लेख न करता मागील काही दिवसांमध्ये घेतलेल्या प्रचार सभांमधून टीका केल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे चंद्रराव तावरेंनीही अजित पवारांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. 16 जूनच्या जाहीर सभेत "85 वर्ष वय झालंय आता. विसमरण होतंय," असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. "(निवडणुकीला) उभं राहण्याचे अधिकार सर्वांना आहे. मात्र 85 वयात कशाला? विसमरण होतंय तब्येत साथ देत नाही. आता पायजमा सोडला आणि लुंगी घातली," अशी शाब्दिक टोलवा टोलवी अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता केली.
AUS
(32 ov) 105/7 (70.3 ov) 225
|
VS |
WI
143(52.1 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.