Baramati Rahuri By Election 2026: बारामतीत बिनविरोध नाहीच! सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणार, पार पडल्या मुलाखती

Baramati Rahuri By Election 2026: बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या धर्तीवर राज्यात सध्या काही राजकीय घडामोडी लक्ष वेधत असतानाच आता या घडामोडींमध्ये काँग्रेसनंही उडी घेतली आहे.   

सायली पाटील | Updated: Apr 3, 2026, 01:22 PM IST
Baramati Rahuri By Election 2026: बारामतीत बिनविरोध नाहीच! सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणार, पार पडल्या मुलाखती
Baramati Rahuri By Election 2026 congress to participate on both seats candidates interview started sharad pawar sunetra pawar

Baramati Rahuri By Election 2026: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असाच सूर सुरुवातीपासून आळवण्यात आला होता. मात्र आता ती परिस्थिती राहिली नसून, हे चित्र आणि राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. नुकतंच बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाचं वृत्त समोर आलं असून, बारामतीत बिनविरोध निवडणूक होणार नसल्याचच स्पष्ट होत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

काँग्रेस पक्ष बारामती आणि राहुरी या दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक लढवणार असून, त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दिल्याचं म्हटलं जात आहे. या निर्णयानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवार, 2 एप्रिल 2026 रोजी उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा पार पडल्या. तर, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही लवकरच उमेदवाराची निश्चिती होणार असून, मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवांरांच्या नावाची घोषणा करणार असल्याची महिती आहे. महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि आणि प्रकाश आंबेडकर या पोटनिवडणुकीत काँग्रेस सोबत असेल. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाशी काँग्रेस नेते या निवडणुकीबाबत चर्चा फोनवरुन करणार आहेत असं सांगण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा : 'सर्व डॅडला माहिती, घरात खूप कॅश यायची'; खरातचा मुलगाच ठरतोय मोठा पुरावा, चार भिंतींआड काय चालायचं, सांगितलं.. 

ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हेच स्पष्ट ​

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचच लक्ष असून, सुनेत्रा पवार ही निवडणूक लढवतील असं जवळपास ठरलं आहे. मात्र, त्यांची निवड बिनविरोध होणार नाही हे मात्र स्पष्ट होत आहे. यापूर्वीसुद्धा पवार कुटुंबातून किंवा शरद पवारांकडून कोणताही उमेदवार देण्यात येणार नाही अशीही चर्चा समोर आली होती. मात्र, मविआतून ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही मांडलं होतं. ज्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हेच स्पष्ट होत आहे. 

या निवडणुकीच सहकार्य मिळावं यासाठी काँग्रेस उबाठा आणि राष्ट्रवादी (SP)शी चर्चा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये शरद पवारांना विश्वासात घेणं ही बाब महत्त्वाची असेल. प्रकाश आंबेडकर आणि जानकरांचा पक्ष आपल्यासोबत असल्याचा दावा काँग्रेसनं केला असल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होत नसल्याचच चित्र आहे. पुढील 2 दिवसांमध्ये काँग्रेस इथं उमेदवार जाहीर करेल असंही म्हटलं जात आहे. त्यामुळं आता हा उमेदवार कोण असेल हे पाहणं महत्त्वाचं. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More